गोंदिया गोंदिया जिल्ह्यात वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांना जागरूक करण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून सरळ कारवाई करण्याऐवजी त्यांना गुलाबपुष्प देऊन नियम मोडू नका, अशी माहिती दिली जात असल्याचा अभिमान राबविले जात आहे.यात दुचाकी चालकांच्या हातात गुलाबपुष्प देऊन वाहनचालकांनी नियमानुसार वाहने चालविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्याच धर्तीवर गोंदिया जिल्ह्यातील गोंदिया-गोरेगाव, साकोली – कोहमारा, सडक अर्जुनी – देवरी महामार्गावरील ढाबा जवळील परिसरात ट्रकच्या अवैध रांगांबाबत ट्रकचालकांना जागरूक करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी त्यांना गुलाबपुष्प देऊन नियमांची माहिती द्यावी. या प्रकाराची मागणी ही ये-जा करणाऱ्यांकडून होऊ लागली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जिल्ह्यातील रस्त्यांवर वाहनचालक वाहतुकीचे नियम न पाळत भरधाव वेगाने वाहने चालवत आहेत. त्यामुळे अपघात होत आहेत. वाढत्या अपघातांचे प्रमाण पाहता वाहतूक पोलिसांकडून नियम मोडणाऱ्या दुचाकी चालकांना गुलाबपुष्प देऊन वाहनचालकांमध्ये जनजागृती करून नियम न मोडण्याची सूचना केली जात आहे. या प्रकारच्या उपक्रमामुळे वाहनचालकांमध्ये सुधारणा दिसून येत आहे, मात्र गोरेगाव-गोंदिया-हिरडामाली-धीमरटोली-मिलटोली महामार्गावर, तसेच साकोली – कोहमारा, सडक अर्जुनी – देवरी महामार्गावरील दोन्ही बाजूला ट्रकच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. त्यामुळे या ठिकाणी नेहमीच अपघाताचा धोका असतो.

हेही वाचा >>>नवीन विद्यापीठ व्यावहारिकदृष्ट्या अयोग्य? अपुऱ्या निधीमुळे अमरावती विद्यापीठाचेच कार्य प्रभावित

महामार्गाची जागा या उभ्या असलेल्या ट्रक नी व्यापलेल्या मुळे इतर ये जा करणाऱ्या वाहनांना जागा अपुरी पडते आणि यामुळे अनेक वेळा अपघातही झाले आहेत. ज्या पद्धतीने दुचाकी चालकांना गुलाबपुष्प देऊन प्रबोधन केले जात आहे, त्याच धर्तीवर ट्रकचालकांना नियमांची माहिती देण्यासाठी त्यांना गुलाबपुष्प देऊन नियमानुसार वाहन चालविण्याची आणि ठराविक पार्किंग ठिकाणी आपले ट्रक उभे करावे अशी माहिती देण्याची मागणी दिली जात आहे. या उपक्रमा नंतर ही ट्रक चालकांनी वाहतुकीचे नियम न पाळल्यास त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी वाहतूक पोलिसांना स्थानिक नागरिकांकडून करण्यात आली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Strict action against truck drivers who occupy the highway sar 75 amy
Show comments