वर्धा : समृध्दी महामार्गावर झालेल्या भीषण अपघाताने आता सर्वांचेच डोळे उघडत आहे. खबरदारी आवश्यक ठरते आहे. या पार्श्वभूमीवर संसद सदस्य रस्ता सुरक्षा समितीच्या विशेष बैठकीचे आयोजन खासदार रामदास तडस यांच्या सूचनेनुसार झाले. जिल्ह्यातील अपघातपूरक स्थळाची माहिती घेत खासदार तडस यांनी अश्या महामार्गावरील ३२ अपघात प्रवण स्थळांवर सूचनेचा फलक लावावेत, वळण रुंद करावे, वेगमर्यदा, रबलिंग स्ट्रप,वाहकांचे समुपदेशन करण्याच्या सूचना दिल्या. अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्या संस्था व व्यक्तींना प्रोत्साहन द्यावे.

समृध्दी मार्गावर दर शंभर किलोमीटर अंतरावर थांबा देण्याचे नियोजन करण्याची बाब अग्रक्रमाने अमलात आणण्याचा आग्रह तडस यांनी सभेत धरला.आमदार डॉ.पंकज भोयर यांनीही त्याचीच री ओढली.तसेच प्रवाशी नोंद कळीचा मुद्दा ठरला असल्याचे बुलढाणा अपघातात दिसून असल्याचे आमदार डॉ.भोयर म्हणाले. त्यावर जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी याबाबत स्पष्ट निर्देश शासनाने दिल्याचे नमूद केले. महामार्गावरून धावणाऱ्या खाजगी बसेस काटेकोर तपासाव्या. प्रवासाचे आरक्षण करतांना प्रवाश्याचे संपूर्ण नाव,पत्ता व मोबाईल क्रमांक नमूद असावे. यात त्रुटी दिसून आल्यास कठोर कारवाई करण्याची सूचना देण्यात आले असल्याचे सांगण्यात आले. अपघातस्थळी तात्काळ आरोग्य सेवा देण्याची बाब उपस्थित करण्यात आली.

Viral video shows car hitting woman distracted by phone the Internet is stunned by what she does next
फोनमध्ये पाहत रस्ता ओलांडते महिला, कारने दिली जोरदार टक्कर अन्…, थरारक अपघाताचा Video Viral
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
in pune katraj person with country made pistol arrested by Crime Branchs Anti Robbery Squad
पिस्तूल बाळगणारा सराइत गजाआड, कात्रज बाह्यवळण रस्ता परिसरात कारवाई
Crime case against the couple, couple pushed traffic police, traffic police,
वाहतूक पोलिसांना धक्काबुक्की करणाऱ्या दाम्पत्याविरुद्ध गुन्हा, कारवाई टाळण्यासाठी बनावट वाहन क्रमांकाची पाटी
Ignorance of Municipal Corporation and Traffic Police Department towards not working traffic signal
नागपूर : बंद वाहतूक सिग्नल; वाहनचालकांना मन:स्ताप, महापालिका-वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष
Pune Blockade, Reckless driving, crime pune,
शहरबात : नाकाबंदीचे फलित
Viral VIDEO: Drunk Constable Unzips And Urinates In Middle Of Road Outside Police Station In Agra
दारूच्या नशेत पोलिसांचे लज्जास्पद कृत्य, रस्त्याच्या मधोमध पँटची चेन उघडली अन्…; घटनेचा VIDEO व्हायरल