मैत्रिणीसोबत मोबाईलवर ‘चॅटिंग’ करणे विद्यार्थिनीला चांगलेच महागात पडले. साकोली येथील एका शाळेतील विद्यार्थिनीला दोन युवकांनी शाळेत जाऊन मारहाण केली. याप्रकरणी पोलिसांनी पास्कोअंतर्गत दोघांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, इयत्ता बारावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने मैत्रिणीसोबत मोबाईलवरून ‘चॅटिंग’ केली. ‘चॅटिंग’मध्ये बदनामीकारक बोलल्याच्या कारणावरून मंगळवारी २३ ऑगस्ट रोजी शाळेत जाऊन या तरुणांनी विद्यार्थिनीला मारहाण केली.
खापरखेडा औष्णिक वीज केंद्रातील अपघात प्रकरणात दोन अधिकारी निलंबित
शिक्षकांनी पोलिसांना या प्रकाराची माहिती दिली. मुलीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी दुर्गेश रणजीत कुसराम (२०, रा. पंचशील वॉर्ड साकोली), कुंदन ऊर्फ साजन रामेश्वर ढोके (२२, रा. जमनापूर) या दोघांना अटक केली आहे.
First published on: 24-08-2022 at 17:17 IST
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Student assaulted for defamatory speech on mobile phone tmb 01