मेडिकलच्या वसतिगृहातील घटना; पॅरासिटामॉलच्या २२ गोळ्या खाल्ल्या

नागपूर : उपराजधानीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल)च्या एमबीबीएस द्वितीय वर्षांची विद्यार्थिनी आणि राज्याचे गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांच्या पुतणीने बुधवारी रात्री मेडिकलच्या वसतिगृहात पॅरासिटामॉलच्या २२ गोळ्या खावून आत्महत्येचा प्रयत्न केला. विद्यार्थिनीची प्रकृती अत्यवस्थ असून तज्ज्ञ डॉक्टर तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार करत आहेत.

brother and sister commit suicide by consuming poison due to debt
कर्जबाजारीपणामुळे उचलले टोकाचे पाऊल, भावा बहिणीची विष प्राषशन करून आत्महत्या
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
stress-related suicide in students news in marathi
अभ्यासाच्या ताणातून विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न
Question mark over quality of medicines tested in two years are of poor quality
औषधांच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह, दोन वर्षात तपासलेल्या २२ हजारापैकी आठ औषधे कमी दर्जाची
student studying in English school at Sea Woods in navi mumbai committed suicide by jumping from the fifth floor
शाळेच्या पाचव्या माळ्यावरून उडी मारून विद्यार्थाने केली आत्महत्या …
nagpur school students suicide
नागपुरात आणखी दोन विद्यार्थ्यांच्या आत्महत्या, काय आहेत कारणे ?
Hundreds of minor boys and girls commit suicide due to exams stress and love affairs
अल्पवयीन मुला-मुलींच्या शेकडो आत्महत्या, परीक्षा, तणाव, प्रेमसंबंध अन्…
Crime News
Crime News : ‘टॉयलेट सीट चाटायला भाग पाडलं…’, १५ वर्षीय विद्यार्थ्याची रॅगिंगला कंटाळून आत्महत्या; आईचा न्यायासाठी आक्रोश

ही १९ वर्षीय विद्यार्थिनी अकोला येथील रहिवासी आहे. मेडिकलच्या द्वितीय वर्षांत शिकत असून वसतिगृह क्रमांक दोनमध्ये राहते. एमबीबीएसच्या अभ्यासक्रमाचा ताण वाढल्यामुळे ती गेल्या वर्षभऱ्यापासून नैराश्यात होती. तिच्यावर उपचार सुरू असले तरी तिने मध्यंतरी परस्पर उपचार बंद केले होते. वसतिगृहातील विद्यार्थिनींच्या म्हणण्यानुसार, गेल्या काही दिवसांपासून ती पुन्हा तणावात दिसत होती. यातच तिने बुधवारी रात्री २२ गोळ्या खाल्ल्या. त्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच ती अस्वस्थ झाली.

ही माहिती तातडीने वसतिगृहाच्या वार्डनसह मेडिकलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली. तिला मेडिकलच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. काही वेळात मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह इतर विभागाच्या प्रमुखांनी अतिदक्षता विभागात धाव घेतली. तिच्या पोटातील पाणी काढण्यासह इतरही उपचार करण्यात आले.

दोन वर्षांत पाच विद्यार्थ्यांचा आत्महत्येचा प्रयत्न

मेडिकलध्ये गेल्या दोन वर्षांमध्ये पाच विद्यार्थ्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. त्यातील दोन जण दगावले. मार्च २०१७ मध्ये एका प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांने झोपेच्या गोळ्या घेत आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यानंतर मे २०१७ मध्ये अशवंत खोब्रागडे याने मेडिकलमधील लायब्ररीच्या पाठीमागील बाजूस कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली. तत्पूर्वी ऑगस्ट २०१६ मध्ये रोशन शिरसाट या विद्यार्थ्यांने वसतिगृह क्रमांक पाचमध्ये गळफास लावून आत्महत्या केली. कौटुंबिक कलहातून एका महिला निवासी डॉक्टरनेही गळा कापून आत्महत्येचा प्रयत्न केला होता.

सध्या प्रकृती स्थिर आहे. परंतु अशा घटनांमध्ये २४ तासानंतर रुग्णाच्या मूत्रपिंड, यकृतात सूज येण्यासह इतर गुंतागुंत वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे डॉक्टर विशेष लक्ष देत आहेत.’’

– प्रा. डॉ. योगेंद्र बनसोड, विभागप्रमुख, औषधशास्त्र विभाग.

Story img Loader