नागपूर : ‘नीट’च्या परीक्षेत कमी गुण मिळाल्याने एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली. गेल्या सहा महिन्यांपासून तो ‘नीट’ची तयारी करीत होता, कमी गुण मिळाल्याने नैराश्य आल्याने त्याने आत्महत्या केली. ही घटना वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. भावेश तेजुसिंह राठोड (१९) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. डॉक्टर व्हायचे स्वप्न उराशी बाळगून तो नागपुरात मेहनत करीत होता. तो मूळचा वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड तालुक्यातील पिंपरी येथील होता. त्यासाठी तो दहावीपासूनच तयारीला लागला होता. नागपुरात आणखी चांगली तयारी करता येईल या उद्देशाने तो येथे आला व शिवसुंदर नगर येथे एका नातेवाइकाच्या घरी राहून प्रशिक्षण वर्गात अभ्यास करीत होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मंगळवारी त्याचा निकाल लागला व त्यात त्याला अपेक्षेनुरूप गुण मिळाले नाही. डॉक्टर होण्याचे स्वप्न भंगणार या विचाराने तो अस्वस्थ झाला. त्याने रात्री ११ वाजाता आपल्या खोलीतील गळफास लावला. सकाळी तो गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. भावेशने गळफास घेण्याअगोदर ‘सुसाइड नोट’ लिहिली होती. त्यात त्याने आई-वडिलांची माफी मागून आत्महत्या करत असल्याचे लिहिले. त्याच्या आई- वडिलांना पोलिसांकडून माहिती देण्यात आली. एकुलत्या एका मुलाचा असा मृत्यू झाल्याने त्याच्या पालकांना मोठा धक्का बसला आहे. त्याच्या मित्रपरिवारातदेखील शोककळा आहे. वाठोडा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.