अकोला : दिवाळीची सुट्टी असल्याने सहलीला गेलेल्या श्री शिवाजी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा विद्यार्थी गौरांग आंबेकर (२०) याचा पातूर घाटात दुचाकी घसरल्याने रविवारी सायंकाळी अपघाती मृत्यू झाला. विशेष म्हणजे, त्याने हेल्मेट परिधान केले होते. मात्र, छातीला दुखापत झाल्याने त्याचा दुर्दैवी अंत झाला.
हेही वाचा – भंडारा : ‘शासन आपल्या दारी’मुळे खोळंबली एसटीची वारी; प्रवाशांचे हाल, शाळांना सुट्टी
हेही वाचा – Gautami Patil : गौतमीचा ‘कच कच कांदा’ गाण्यावर नाच आणि स्क्रिनवर विश्वचषक फायनलचा थरार
अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी पातूरजवळ असलेल्या दुधाना येथे सहलीला जात होते. त्यात गौरांगचाही सहभाग होता. दुचाकीवर असलेल्या गौरांग आंबेकर याची गाडी पातूर घाटात घसरली. त्यानंतर तो दुभाजकावर आदळला. त्याच्या छातीला गंभीर दुखापत झाल्याने घटनास्थळीच त्याचा मृत्यू झाला. अपघातानंतर सोबत असलेल्या मित्रांनी त्याला उपचारासाठी अकोल्यातील खासगी रुग्णालयात आणले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दुचाकीवर स्वार होताना गौरांगने हेल्मेट घातलेले होते. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.