राज्याच्या शेवटच्या टोकावर महाराष्ट्र – तेलंगणा सीमेवर असलेल्या अतिदुर्गम जीवती तालुक्यातील गोंडगुडा (धोंडाअर्जुनी) येथे चौथीत शिकणाऱ्या विद्यार्थिनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहले आहे. हे पत्र समाजमाध्यमावर व्हायरल झाल्याने या चौथीत शिकणाऱ्या विद्यार्थिनींची राज्यभर चर्चा सुरू आहे
या विद्यार्थिनीने, तुम्ही दिलेले पुस्तक मला आवडलेले नाही, जुनेचे पुस्तक छान होते. एकाच पुस्तकात सगळे विषय होते. त्यामुळे एकाच विषयाचे पुस्तके वाचायला मजा यायची असे लिहत आता तुम्हाला अभ्यास सोडून पत्रच लिहीत राहायचे काय? असा प्रश्न तिने उपस्थित केला आहे. त्यामुळे विद्यार्थिनीने हे पत्र समाजमाध्यमात प्रचंड व्हायरल झाले आहे.
हेही वाचा >>> बुलढाणा: मुख्याध्यापकास मारहाण, आरोपीस एक वर्ष सश्रम कारावास
राज्याच्या शेवटच्या टोकावर जिवती तालुका आहे. राजुरा विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या हा तालुका मागास, अतिदुर्गम व आदिवासीबहुल म्हणून ओळखला जातो. हा तालुका मागास असल्याने येथील अनेक गावात मूलभूत सुविधांचा अभाव आहे. लोकप्रतिनिधींनी कायमचेच या तालुकाच्या विकासाकडे दुर्लक्ष केले. मागास असलेल्या या तालुक्यातील एका जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकणाऱ्या मुलीची चर्चा मात्र सध्या राज्यभर सुरू आहे.
हेही वाचा >>> बुलढाणा: पन्नास आंदोलकांचे उपोषण तिसऱ्या दिवशीही दुर्लक्षित, ‘भूमी हक्क’ मध्ये संताप
काय आहे पत्रात
‘माझी शाळा सुंदर शाळा’ या उपक्रमाअंतर्गत मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रत्येक विद्यार्थ्यांला पत्र पाठविण्याचे आवाहन केले होते. प्रत्येक शाळेतील विध्यार्थी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवित आहेत. चंद्रपूर जिह्याचा शेवटचा टोकावर असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, गोंडगुडा (धोंडाअर्जुनी) या शाळेत चौथीत शिकणाऱया तिमरा सय्यद या विद्यार्थिनीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठविले आहे.
तिने या पत्रात लिहले कि, माननीय मुख्यमंत्री तुम्ही दिलेले पाठय़पुस्तक मला आवडले नाही. कारण एका विषयासाठी चार-चार पुस्तके शोधाव लागतात. यापेक्षा आमचे जुने पुस्तकच छान होते. कारण सगळे गणित एका पुस्तकात, सगळे इंग्रजी एका पुस्तकात, सगळे विज्ञान एका पुस्तकात होते. त्यामुळे एकाच विषयाचे पुस्तक वाचायला मजा यायची,’ असे या विद्यार्थिनीने पत्रात म्हटले आहे. त्यानंतर तिने संतापून अभ्यास सोडून तुम्हाला पत्रच लिहीत राहायचे काय? असा प्रश्न तिने उपस्थित केला आहे. त्यामुळे जिवती तालुक्यात येणाऱ्या गोंडगुडा ( धोंडा अर्जुनी ) जिल्हा परिषदेची शाळा चर्चेत आली आहे. या शाळेत इयत्ता पहिली ते पाचवी पर्यंत वर्ग आहेत. या शाळेत एकूण ३६ विद्यार्थी शिक्षण घेत आहे.