चुकीच्या उत्तरात बदल न करता प्रश्न रद्दबातल
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
देवेश गोंडाणे
नागपूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२० ची उत्तरतालिका १७ नोव्हेंबरला प्रसिद्ध केली. यातील चुकीच्या उत्तरांवर घेण्यात आलेल्या आक्षेपानंतर आयोगाने उत्तरांमध्ये बदल न करता सरसकट प्रश्नच वगळल्याने अचूक उत्तर सोडवणाऱ्या हजारो उमेदवारांना ०.२५ गुणांनी अनुत्तीर्ण व्हावे लागले आहे. आयोगाने जर उत्तरात बदल केला असता तर अचूक उत्तर नोंदवणाऱ्या उमेदवारांच्या गुणांमध्ये दोन गुणांची वाढ झाली असती. आयोगाच्या अशा अन्यायकारक धोरणामुळे उमेदवारांमध्ये प्रचंड रोष असून राज्य शासनाने याची दखल घेत न्याय द्यावा, अशी मागणी केली जात आहे.
एमपीएससीतर्फे राज्य दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्वपरीक्षा ४ सप्टेंबर २०२१ला घेण्यात आली होती. एसटीआय, पीएसआय, एसओ या पदांसाठी झालेल्या या परीक्षेची उत्तरतालिका १७ नोव्हेंबरला प्रसिद्ध करण्यात आली. ज्यातील चुकीच्या उत्तरांवर उमेदवारांनी पुराव्यांसह आक्षेप घेतले. आयोगाकडून उत्तरांवर आलेल्या आक्षेपांची तज्ज्ञांकडून तपासणी करून त्यात बदल केला जातो. मात्र, उत्तरांमध्ये झालेली आपली चूक लपवण्यासाठी आयोगाने या दोन्ही प्रश्नांच्या उत्तरांमध्ये बदल न करता ते प्रश्नच रद्दबातल ठरविले. आयोगाच्या क्षुल्लक चुकांचा फटका होतकरू उमेदवारांना बसत असल्याने राज्य शासनाने याची दखल घेत उत्तरतालिकांसह निकालामध्ये त्वरित बदल करावा, अशी मागणी उमेदवारांनी केली आहे. शेकडो उमेदवारांनी यासंदर्भात आयोगाला निवेदनेही पाठवली आहेत. याबाबत आयोगाच्या सचिवांशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
प्रकार काय?…
या उत्तरतालिकेमध्ये प्रश्नपत्रिका कोड ‘अ’मधील प्रश्न क्रमांक २७ मध्ये चार विधाने दिली होती. त्यापैकी योग्य विधान विद्यार्थ्यांना निवडायचे होते. यामध्ये पहिला पर्याय ‘अ-वेरूळ लेणी औरंगाबाद जिल्ह्यात आहे’ असा होता. तर चौथा म्हणजे ‘ड’ पर्याय ‘गौताळा राष्ट्रीय उद्यान जळगाव जिल्ह्यात आहे’ असा होता. आयोगाने उत्तरतालिकेमध्ये फक्त ‘अ’ आणि ‘ड’ विधान बरोबर आहे. हा तिसरा पर्याय बरोबर असल्याचे जाहीर केले. मात्र, पुस्तकातील संदर्भानुसार गौताळा हे राष्ट्रीय उद्यान नसून ते अभयारण्य आहे. त्यामुळे तज्ज्ञांच्या मते, प्रश्नातील चारही पर्यायांमध्ये ‘अ-वेरूळ लेणी औरंगाबाद जिल्ह्यात आहे’ हे एकमेव विधान बरोबर होते. त्यामुळे उमेदवारांनी फक्त ‘अ’ विधान बरोबर असलेला पहिला पर्याय निवडला. यामुळेच आयोगाच्या उत्तरतालिकेवरही आक्षेप घेण्यात आला होता. मात्र, आयोगाने आक्षेपानंतर या प्रश्नाच्या उत्तरामध्ये सुधारणा न करता क्रमांक २७ हा प्रश्नच रद्द केला. आयोगाच्या अशा अन्यायकारक धोरणामुळे ज्या उमेदवारांनी ‘अ’ हा अचूक पर्याय निवडला त्यांच्या एका गुणाचे नुकसान झाले. असाच गोंधळ प्रश्न क्रमांक १७ मध्येही आयोगाने घातला आहे. आक्षेपानंतर आयोगाने या दोन्ही प्रश्नांच्या उत्तरांमध्ये बदल न करता प्रश्नच वगळण्याचे धोरण अवलंबल्याने शेकडो उमेदवारांना दोन गुणांचा फटका बसला आहे. अनेक उमेदवारांना अनुत्तीर्ण व्हावे लागले. तर पोलीस उपनिरीक्षक पदासाठीच्याही शेकडो उमेदवार १.५ गुणांनी अपयशी ठरले आहेत.
आक्षेप काय?
नुकत्याच झालेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षेत ‘गौताळा’ हे अभयारण्य आहे असे संदर्भ असलेला प्रश्न आला आहे. याशिवाय वन विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावरही ‘गौताळा अभयारण्य’ असाच संदर्भ आहे. शासनदफ्तरी जर गौताळा हे अभयारण्य अशी नोंद असेल तर एमपीएससीच्या प्रश्नपत्रिकेत गौताळा ‘राष्ट्रीय उद्यान’ हे उत्तर कसे बरोबर राहू शकते, असा आक्षेप यावर घेण्यात आला आहे.