नागपूरमध्ये बारावीच्या विद्यार्थ्याने ‘मला दहावीपासूनच आत्महत्या करण्याची इच्छा होती. मी कसातरी बारावीपर्यंत संयम बाळगला, आता मी आत्महत्या करण्याची इच्छा पूर्ण करतोय,’ अशी सुसाईड नोट मोबाईलमध्ये लिहून आत्महत्या केली. आदित्य मधूकर मोवाडे (१७, साईनगर गोधनी रोड) असं आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मधूकर मोवाडे आणि त्यांची पत्नी दोघेही बँकेत नोकरीवर आहेत. त्यांना दोन मुले आहेत. मोठा मुलगा अभियांत्रिकेचे शिक्षण घेतो, तर लहान मुलगा आदित्यने नुकताच बारावीची परीक्षा दिली. त्यालासुद्धा भावाप्रमाणे अभियंता व्हायचे होते. म्हणून तो जेईई परीक्षेची तयारी करीत होता. आदित्य हा अभ्यासात अत्यंत हुशार होता. नवनवीन कला-गुण शिकण्याची त्याला आवड होती. तो चिकित्सक स्वभावाचा होता.

हेही वाचा : धक्कादायक ! १२ वर्षीय मुलीचा २२ वर्षाच्या तरुणासोबत बालविवाह, मुलगी गर्भवती असल्याचे समजताच पालकांनी लावून दिले लग्न

मंगळवारी आई-वडिल बँकेत गेले होते, तर भाऊ बाहेर गेला होता. त्यावेळी आदित्यने सायंकाळी सहा वाजता मोबाईलमध्ये सुसाईड नोट लिहिली आणि खिडकीला दोरीने गळफास घेऊन आत्मत्या केली. सायंकाळी भाऊ घरी आल्यानंतर ही घटना उघडकीस आली. या प्रकरणी मानकापूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

Story img Loader