कराटेचे प्रशिक्षण घेताना झालेल्या मैत्रीतून १७ वर्षाच्या मुलाने १६ वर्षीय मुलीशी शारीरिक संबंध प्रस्तापित केले. ती मुलगी चार महिन्यांची गर्भवती झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी जरीपटका पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. जरीपटक्यात राहणारी १६ वर्षीय मुलगी दहावीची विद्यार्थिनी आहे. ती कराटे क्लासला जात होती. त्याच प्रशिक्षण केंद्रात सराव करणारा १७ वर्षीय आरोपी मुलाने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : अकोला : आमदार मिटकरी व जिल्हाध्यक्ष मोहोड यांच्यातील मतभेद टोकाला

सप्टेबर २०२१ मध्ये तिला अंबाझरीतील एका मित्राच्या घरी नेऊन तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले होते. त्यानंतर दोघेही वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित करायला लागले. यादरम्यान ती गर्भवती झाली. अल्पवयीन असलेल्या दोघांनाही गर्भपाताबाबत माहिती नव्हती. मुलीची प्रकृती बिघडल्यामुळे तिच्या आईने रुग्णालयात नेल्यानंतर मुलगी गर्भवती असल्याचे उघडकीस आले. विचारणा केली असता मुलीने प्रियकराचे नाव सांगितले. जरीपटका पोलिसांनी मुलीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Student pregnant by classmate case of rape has been registered in nagpur tmb 01