बुलढाणा : होय! यंदा दहावी व बारावीची परीक्षा देणाऱ्या बुलढाणा जिल्ह्यासह राज्यातील प्राविण्यप्राप्त खेळाडूंना  ‘ग्रेस ‘ गुणा साठी केवळ आणि केवळ ऑन लाईन पद्धतीनेच आपले अर्ज सादर करावे लागणार आहे.इयत्ता १० वी व १२ वी विद्यार्थ्यांचे ग्रेस गुण अर्ज शासनाच्या आपले सरकार प्रणालीद्वारे केवळ ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्याबाबत क्रीडा आयुक्तांनि  सुचित केले आहे. खेळाडूंना आपला सवलत गुण अर्ज आपले सरकार पोर्टलवर  सादर करावे लागणार आहे. राज्याचे क्रीडा आयुक्तानी यासंदर्भातील आदेश जारी केले आहे.

आजवर जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या मार्फत खेळाडू विध्यार्थ्यांचे सवलत गुण अर्ज ऑफ लाईन पद्धतीने पाठविण्यात येत होते. मात्र यांच्या शैक्षणिक सत्रा पासून यात बदल करण्यात आला आहे. यंदापासून ऑन लाईन पद्धतीने आपले सरकार पोर्टल द्वारे सवलत गुणांचे अर्ज भरावे लागणार आहे.सर्व खेळाडू विद्यार्थी आणि माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना आपले सरकार पोर्टलवर या वर्षीपासून सवलत गुणांचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरणे बंधनकारक करण्यात आले आहे.  ऑफ लाईन पद्धतीने अर्ज पाठविताना मानवीय चुकामुळे आजवर अनेक खेळाडू विध्यार्थ्यांनागुणांचा फटका बसला. अनेकांना सवलत गुण मिळालेच मिळालेच नाही. यामुळे खेळाडूंच्या तक्रारी वाढल्या, एवढेच नव्हे त्यांचे शैक्षणिक, नोकरी विषयक नुकसान झाले. यामुळे यंदाच्या शैक्षणिक सत्रा पासून ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Bride breaks marriage in mandap after friend says something in grooms ears shocking video went viral
बापरे! मित्र लग्नमंडपात आला, कानात कुजबुजला अन् क्षणार्धात मोडलं लग्न; धक्कादायक Video Viral
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Saif Ali Khan's attacker detained by Mumbai Police
Saif Ali Khan Stabbed Case: सैफ अली खानवर चाकूहल्ला करणारा सापडला? मुंबई पोलिसांनी एकाला घेतलं ताब्यात, चौकशी सुरू!
Chandrapur connection of judicial inquiry into Santosh Deshmukh murder case
बहुचर्चित संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या न्यायालयीन चौकशीचे चंद्रपूर कनेक्शन
Intruder entered in Jeh bedroom Saif Ali Khan's staff narrates attack sequence
जेहच्या खोलीतील बाथरूममध्ये…; सैफ अली खानच्या घरात काय घडलं? करीना कपूर कुठे होती? मदतनीसने सगळंच सांगितलं
allahabad high court justice shekhar kumar yadav
Justice Shekhar Yadav: वाद होऊनही अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ‘त्या’ विधानावर ठाम; म्हणाले, “मी नियम मोडलेला नाही”!
Donald Trump Won US Presidential Election 2024
Donald Trump Won US Election 2024: जागतिक महासत्तेच्या चाव्या पुन्हा डोनाल्ड ट्रम्प यांच्या ताब्यात; अमेरिकेत मोठ्या विजयासह सत्तारूढ होणार!
Railways makes high tech option of buying unreserved tickets available through app
अनारक्षित रेल्वे तिकीट खरेदी आता ‘हायटेक’ ,तीन टक्के बोनसही; वाचा कसा लाभ घेता येणार?

हेही वाचा >>>अमरावती: अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार, महिनाभरातील चौथा बळी

सदर सवलत गुण प्रक्रिया निर्दोष करण्यासाठी, या वर्षीपासून म्हणजेच २०२४-२५ यावर्षापासून ग्रेस गुणांसाठी केली जाणारी प्रक्रिया शासनाच्या आपले सरकार पोर्टलद्वारे ऑनलाईन करण्यात आली आहे. तसेच सदर पोर्टलद्वारे सर्व अर्ज ऑनलाईन प्रणालीद्वारेच महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्याकडे सादर करण्याची सुविधा निर्माण करुन देण्यात आली आहे. यामुळे सर्व खेळाडू विद्यार्थी जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय यांनी आपले सरकार अॅपद्वारे या वर्षीपासून सवलत गुणांचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरावयाचा आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी बी एस महानकर यांनी याला पुष्टी दिली आहे. कोणताही खेळाडू जिल्हा क्रीडा कार्यालय, बुलढाणा येथे ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करणार नाही. अशा प्रकारचा अर्ज जिल्हा क्रीडा कार्यालय, बुलढाणा यांचेकडून स्विकारल्या जाणार नाही, असे  महानकर यांनी स्पष्ट केले आहे.

Story img Loader