लोकसत्ता खास प्रतिनिधी

नागपूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) प्रलंबित परीक्षांच्या जाहिरातींमध्ये सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरिता अधिनियम २०२४ मधील आरक्षणाच्या तरतुदी विचारात घेता सुधारित आरक्षण निश्चिती केली जाणार आहे. यामुळे ‘एमपीएससी’च्या अनेक परीक्षा लांबणीवर पडल्या आहेत. तीन महिन्यांपूर्वी स्थगित झालेली समाजकल्याण विभागातील विविध पदांच्या परीक्षेची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. त्यातच विधानसभा निवडणूक तोंडावर आल्याने आचारसंहिता लागल्यास परीक्षा आणखी लांबणीवर पडण्याची भीती विद्यार्थ्यांना आहे.

mpsc group c main examination 2023 exam centers given in mumbai
परीक्षेसाठी केवळ मुंबईत केंद्र; ‘एमपीएससी’चा भोंगळपणा, उमेदवारांची तीव्र नाराजी
reason behind delay in mpsc exam
विश्लेषण : ‘एमपीएससी’च्या परीक्षा का लांबल्या? नियोजन बिघडल्याने विद्यार्थी चिंतेत? 
barti Free coaching for UPSC MPSC
यूपीएससी, एमपीएससीचे मोफत प्रशिक्षण, १३ हजार रुपये मासिक विद्यावेतनही मिळणार, फक्त येथे अर्ज करा
MPSC, social welfare,
अखेर ‘एमपीएससी’कडून समाजकल्याणच्या परीक्षेची तारीख जाहीर, या तारखेला होणार परीक्षा
success story Heartbroken lover become officer after his girlfriend reject him
VIDEO: स्पर्धा परीक्षेत नापास झाला अन् प्रेयसी सोडून गेली; पुढच्या वर्षी पास होत तिच्याच घरासमोर लावल्या ७५ तोफा
article about mpsc exam preparation guidance mpsc exam preparation tips in marathi
MPSC मंत्र : महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित पूर्व परीक्षा – राज्यव्यवस्था
mpsc main exam 2025 will be conducted in descriptive mode
विश्लेषण : ‘एमपीएससी’च्या वर्णनात्मक परीक्षेचे स्वरूप कसे असेल?
non creamy layer, candidates,
‘एमपीएससी’ देणाऱ्या महिला उमेदवारांना दिलासा, खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी ‘नॉन क्रिमिलेअर’ची अट रद्द

‘एमपीएससी’ने मे २०२३ मध्ये समाज कल्याण विभागातील साहाय्यक आयुक्त, समाज कल्याण व संबंधित गट अ, सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभाग ४१, समाज कल्याण अधिकारी, गट ब, सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभाग २२, गृहप्रमुख, गट ब, समाज कल्याण आयुक्तालय, सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागातील १८ अशा विविध पदांसाठी जाहिरात दिली होती. राज्यातील हजारो विद्यार्थ्यांनी यासाठी अर्ज केले आहेत. ‘लोकसत्ता’ने सातत्याने हा विषय लावून धरल्यानंतर आयोगाने अभ्यासक्रम आणि परीक्षेची तारीख जाहीर केली. त्यानुसार १९ मे रोजी समाज कल्याण अधिकारी गट ‘ब’ या पदासाठी परीक्षा होणार होती. मात्र, आयोगाने सुधारित आरक्षणनिश्चिती प्राप्त झाल्यानंतरच परीक्षांबाबत घोषणा केली जाईल, असे सांगत परीक्षा स्थगित केली. ‘महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४’ ही परीक्षाही स्थगित करण्यात आली होती. मात्र, मराठा आरक्षणानुसार नवीन आरक्षण निश्चिती करून आयोगाने नागरी सेवा परीक्षेची सुधारित तारीख जाहीर केली. परंतु समाज कल्याण विभागातील विविध पदे आणि अन्य विभागांच्या परीक्षांची तारीख अद्याप जाहीर न झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. विशेष म्हणजे, महाराष्ट्रात ऑक्टोबरमध्ये विधानसभेच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आचारसंहिता लागल्यास परीक्षा पुन्हा लांबणीवर पडतील आणि अधिक कालपव्यय होईल, याची विद्यार्थ्यांना भीती आहे.

हेही वाचा >>>यवतमाळ : महागाव तालुक्यात सशस्त्र दरोडा, ३० लाख रोख व १७ तोळे सोन्याचे दागिने लुटले; महिलांना अमानुष मारहाण

लांबणीवर पडलेल्या एमपीएससीच्या परीक्षा जाहीर होत नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. त्यातच विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेची टांगती तलवारही आहे…

चिंता का?

●तारखा जाहीर झाल्या तर विद्यार्थ्यांना अभ्यासाचे वेळापत्रक तयार करणे सोपे जाते.

●परीक्षा लांबणीवर गेल्यास पुण्यासारख्या शहरांत राहून आर्थिक भार सहन करावा लागतो.

●वेळेत परीक्षा न झाल्यामुळे अन्य परीक्षांची तयारी करता येत नाही.

●परीक्षा लांबल्यामुळे मानसिक दडपण वाढत जाते.