वर्धा : दहावी व बारावीच्या परीक्षा विद्यार्थी व त्यांच्या पालकांनाही महत्त्वाच्या ठरतात. पुढील दिशा ठरविणाऱ्या या परीक्षा चोख पार पडाव्या म्हणून शिक्षण मंडळे सर्व ती खबरदारी घेत असतात. पण तरीही काही गैरप्रकार तांत्रिक सहाय्य घेत होतच असल्याचे दिसून येते. प्रामुख्याने मोबाईलच्या माध्यमातून प्रश्नपत्रिका फुटण्याचे गैरप्रकार घडल्याचे उघडकीस आले आहे. आता त्यावर कडक उपाय शोधण्यात आला आहे. तो दंडात्मक स्वरूपाचा आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सेंट्रल बोर्ड सेकंडरी एज्युकेशनतर्फे घेण्यात येणाऱ्या दहावी व बारावीच्या परीक्षा १५ फेब्रुवारीपासून सूरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर  या सीबीएससीतर्फे विद्यार्थी व पालकवर्गासाठी  काही मार्गदर्शक तत्वे प्रसिद्ध केली आहेत. जर विद्यार्थ्याने या मार्गदर्शक तत्वचे पालन केले नाही तर तर त्यास दोन वर्षाची बंदी घातली जाणार. असा विद्यार्थी दोन वर्ष सदर परीक्षेस बसू शकणार नाही. म्हणजे मोबाईल व इतर इलेक्ट्रॉनिक्स उपकरण  वापरण्यास मनाई आहे. जर कोणताही विद्यार्थी असे उपकरण  उपयोगात आणतांना दिसला तर त्याला पुढील दोन वर्ष परीक्षेस बसता येणार नाही. या पूर्वी बंदी होतीच. पण ती एक वर्षाची होती. आता दोन वर्षाची तरतूद करण्यात आली आहे.

मंडळाचे परीक्षा नियंत्रक डॉ. संयम भारद्वाज यांनी ही बाब स्पष्ट केली. परीक्षा केंद्रावर कोणत्याही प्रकारचे इलेक्ट्रॉनिक उपकरण किंवा मोबाईल फोन वापरले किंवा जवळ ठेवले तर विद्यार्थी केवळ यावर्षीच नव्हे तर पुढील वर्षीही परिक्षेला बसू शकणार नाही. परीक्षा पारदर्शक होण्यासाठी परीक्षा केंद्रावर सीसीटिव्ही कॅमेरे लावल्या जाणार असल्याचे ते म्हणाले. परीक्षेशी संबंधीत खोट्या अफवा पसरविण्याचे प्रकार सोशल मिडियावर यापूर्वी घडले आहे. म्हणून केंद्रीय मंडळाने सोशल मिडियावर परिक्षेशी संबंधीत खोटी माहिती देण्याचे कृत्य अनूचीत ठरविले आहे. म्हणजे अशी बाब दिसून आल्यास अनूचीत साधन नियमांतर्गत कारवाई केल्या जाईल.

अग्निहोत्री ग्रुप ऑफ एज्युकेशनचे सचिन अग्निहोत्री हे म्हणाले की मंडळाचे हे पाऊल स्वागतार्ह आहे. मोबाईलला ब्लू टूथ किंवा तत्सम उपकरणे जोडून गैरप्रकार करण्याच्या घटना परीक्षा केंद्रावर घडल्या आहेत. या माध्यमातून प्रामुख्याने प्रश्नपत्रिका हाती पडल्यावर ती लगेच केंद्राबाहेर प्रसारीत होते आणि अनूचीत प्रकार घडतात. स्मार्ट वॉचच्या माध्यमातून देखील परीक्षेत अनूचीत प्रकार घडले आहे. प्रथमदर्शनी ते ओळखू पण येत नाही. नव्या शैक्षणीक धोरणात तर अश्या साधनांचा दूरूपयोग होण्याची अधिक शक्यता आहे. म्हणून मंडळाने घेतलेली सावधगिरी परीक्षा अधिक पारदर्शी होण्यास पूरक ठरते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Students ban for two years if caught with a mobile phone during exams pmd 64 zws