मागील वीस दिवसांपासून अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. गावात हाहाकार माजला आहे. शेती, घरे यांची नुकसान झाले. त्याचा फटका शालेय विद्यार्थ्यांनी बसला. अशातच गावात पाहणी करण्यासाठी खासदार येणार असल्याची माहिती विद्यार्थ्यांना मिळाली. ते गावात येताच विद्यार्थ्यांनी त्यांची वाट अडवून धरली.
हा प्रकार बघून खासदारही आवाक झालेत. या मुलांची मागणी काय असा प्रश्न त्यांना पडला. पण मुलांनी वाट अडवली होती ती खासदारांच्या स्वागतासाठी. हे समजताच ते सुद्धा भारावले. खासदार बाळू धानोरकर यांच्या सोबत हा प्रसंग घडला.
चंद्रपूर वनी लोकसभा मतदारसंघाचे खासदार बाळू धानोरकर पूर परिस्थिती पाहणी करण्यासाठी मतदारसंघांमध्ये दौरे करीत आहेत. त्याच अनुषंगाने अतिवृष्टीमुळे ग्रस्त झालेल्या देवाळा गावाला त्यांनी भेट दिली. नुकसानीची पाहणी करत असताना गावातील चिमुकल्यांनी त्यांची वाट अडवून धरली आणि त्यांचा सत्कार केला.