लोकसत्ता टीम

नागपूर: पुणे लोकसभा मतदारसंघासाठी मतदान १३ मे रोजी होणार आहे. त्यानंतर पुण्यातील पोलीस यंत्रणेवरील ताण हलका होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा २०२२ या परीक्षेतील पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) संवर्गाची शारीरिक चाचणी १३ मे नंतर आयोजित करावी. तसेच ही प्रक्रिया पावसाळ्यापूर्वी पार पाडावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

Antar Singh Aryas appeal to youth says responsibility of youth to save tribals
आदिवासींना वाचविण्याची युवापिढीवर जबाबदारी, युवा संवादमध्ये अंतरसिंग आर्या यांचे आवाहन
8th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
८ सप्टेंबर पंचाग: मेष, कुंभसह ‘या’ पाच राशींच नशीब बदलणार इंद्र योग; सुखाच्या सरी बरसणार तर कोणाचे कष्ट वाढणार; वाचा तुमचे भविष्य
Free electricity, farmers, mahavitaran,
मोफत वीज योजना : नाव शेतकऱ्यांचे, लाभ महावितरणचा, वीज ग्राहक संघटना म्हणते..
police
‘महाराष्ट्र बंद’ची हाक; बदलापूरमधील घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीचे आंदोलन
CBSE, CBSE schools, CBSE schools wardha,
CBSE schools : सीबीएसई शाळांना नव्याने मान्यता घ्यावी लागणार; ‘हे’ आहे कारण…
MPSC Students Protest in Pune
MPSC च्या विद्यार्थ्यांची मागणी सरकार मान्य करणार? देवेंद्र फडणवीसांनी दिलं ‘हे’ आश्वासन
student protest in pune
स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचं पुण्यात ठिय्या आंदोलन; नेमकं कारण काय?
MPSC, MPSC combine exam,
‘एमपीएससी’ संयुक्त परीक्षेची जाहिरात कधी येणार बघा? आयोगाने सांगितले…

एमपीएससीकडून पीएसआय पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. पीएसआय पदाची पूर्व परीक्षा ८ ऑक्टोबर २०२२ रोजी घेण्यात आली. तब्बल एक वर्षाने मुख्य परीक्षा १ ऑक्टोबर २०२३ रोजी घेण्यात आली. मुख्य परीक्षेचा निकाल लागल्यानंतर गेल्या पाच महिन्यांपासून शारीरिक चाचणीसाठी विद्यार्थी वाट पाहत आहेत. मात्र एमपीएससीच्या उदासीन कारभारामुळे मैदानी चाचणीला मुहूर्त लाभला नाही. लोकसभा निवडणुकीमुळे प्रशासनावर ताण असतो. याचा विचार करुन एमपीएससीने मैदानी चाचणीच्या तारखा जाहीर करणे आपेक्षित होते.

आणखी वाचा-राज्यात सौर ऊर्जा निर्मिती करणाऱ्यांची संख्या १.४० लाखावर

मात्र कोणतेही नियोजन न करता तारीख जाहीर केली. त्यानंतर पु्न्हा १५ एप्रिल ते २ मे, २०२४ या कालावधीत मैदानी चाचणी आयोजित करण्यात आली. मात्र राज्यात होणाऱ्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ करिता मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त व कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याकरिता मनुष्यबळ आवश्यक असल्याने शारीरिक चाचणीच्या कार्यक्रमाकरिता पोलीस अधिकारी तसेच इतर मनुष्यबळ पुरविणे शक्य होणार नसल्याचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक यांनी कळविले आहे. हे विचारात घेता शारीरिक चाचणीचा १५ एप्रिल ते २ मे, २०२४ या कालावधीतील नियोजित कार्यक्रम पुढे ढकलण्यात येत असून, शारीरिक चाचणीचा सुधारित सविस्तर कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल. असे एमपीएससीने जाहीर केलेल्या घोषणा पत्रक प्रसिद्ध केले होते. त्यावर एमपीएससी प्रशासनाला नियोजन करता येत नसून त्यांनी मार्गदर्शन घेण्याचा विद्यार्थ्यांनी संतापजनक सल्ला दिला होता.

आता दोन वेळा शारीरिक चाचणीची तारीख पुढे ढकलल्याने एमपीएससीने योग्य नियोजन करुन शारीरिक चाचणी पावसाळ्यापूर्वी घ्यावी. तसेच तशी तारीख जाहीर करावी, अशी मागणी केली आहे. पुण्यात १३ मे नंतर मैदानी चाचणी राज्य राखीव बल (एसआरपी) येथील मैदानावर चाचणी घेतली तर पोलीसांचे मनुष्यबळ देखील उपलब्ध होईल. यापूर्वी देखील एमपीएससीने मैदानी चाचणी या मैदानावर घेतली आहे. त्यामुळे केवळ मुंबईमध्येच चाचणी घेण्याचा एमपीएससीने हट्ट सोडावा आणि नियोजन करावे असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.

आणखी वाचा-तब्बल २७६ विमान, हेलिकॉप्टर प्रचारासाठी नागपुरात; विमानतळाला असा झाला लाभ

लोकसभा निवडणुकींमुळे पीएसआयची शारीरिक चाचणीची परीक्षा ही १५ ते २७ एप्रिल दरम्यान १९, २६ आणि २७ एप्रिल रोजी होणारी शारीरिक चाचणीची परीक्षा ही २९, ३० एप्रिल आणि आणि ०२ मे २०२४ रोजी पोलीस मुख्यालय नवी मुंबई येथे होणार असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे उमेदवारांनी नाराजी व्यक्त केली होती. परंतु विशेष पोलीस उपमहानिरीक्षक यांनी मैदानी चाचणी घेणे शक्य नसल्याचे कारण देत मैदानी चाचणी पुढे ढकलली. लोकसभा निवडणुकीमुळे पोलिसांसह सरकारी कर्मचार्‍यांना निवडणुकीचे कामकाज दिले जाते. याची प्रत्येक विभागाला माहिती असते. तरी देखील एमपीएससीने कोणतेही नियोजन करता सरसकट तारखा जाहीर करुन ढिसाळ नियोजनाचे प्रदर्शन दाखविले, असा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.