वर्धा : मुलगा शाळेत गेला अन मृतावस्थेच परतल्याची घटना उजेडात आली आहे. वर्धेलगत  दहेगाव मिस्कीन येथे जिल्हापरिषद शाळा आहे. याच शाळेत शिकणाऱ्या युग संदीप मांडवकर हा नऊ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. तो वीकलांग  आहे.

संडासकडे जातो म्हणून तो बाहेर पडला. उघड्यावरच बसला. तिथून निघतांना चिखलात फसला. त्यात त्याचा मृत्यू झाला. यात दोषी कोण याची गावात चर्चा होत आहे. कारण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार शाळेतच संडास असणे आवश्यक आहे. मग मुलगा बाहेर पडलाच कसा, असा प्रश्न उपस्थित केल्या जात आहे. त्याची हजेरी घेण्यात आली की नव्हती, असेही विचारल्या जात आहे. तपास सूरू असल्याचे सावंगी पोलीस नमूद करतात.

वडनेर येथील २७ वर्षीय युवक राजेंद्र अंबादास कोवे हा शेतात विहीर बांधण्याच्या कामात होता. त्याचा तोल गेल्याने तो विहिरीत पडला. त्यात त्याचा मृत्यू झाल्याची नोंद वडनेर पोलिसांनी घेतली आहे.

हेही वाचा >>>गोंदिया : रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाचे ; ‘या’ रेल्वे रद्द, कामकाज प्रभावित…

छताचा  पंखा अंगावर पडल्याने की करंट लागल्याने मृत्यू झाला, याबाबत तर्क व्यक्त होत आहे. मोरेश्वर उत्तमराव ढोबळे हे ४० वर्षीय गृहस्थ यांनी दिवसभर काम केले. तक्रार देणारे गावी निघून गेले. कारण त्यांच्या मुलाची तब्येत खराब झाली होती.  ते परत कामावर आले तेव्हा  मोरेश्वर ढोबळे हे नेहमी झोपत असलेल्या ठिकाणी मृत पाडून असलेले दिसले. लगत असलेल्या बल्लीला  पंखा बांधून असतो. तो पंखा त्यांच्या अंगावर पाडून होता. तसेच इलेक्ट्रिक वायर तुटून पडली  होती. त्यामुळे करंट लागून मृत्यू झाल्याची तक्रार दहेगाव येथे झाली आहे. मृत ढोबळे हे वर्धेलगत  पिपरी मेघे येथील रहिवासी आहेत.

 जिवानीशी  ठार मारण्याचा उद्देश असणाऱ्या रणजित रामकृष्ण धवणे या आरोपीस सात वर्ष सश्रम कारावास  तसेच दहा हजार रुपयाचा दंड ठोठावण्यात आला आहे. जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश  एन. बी. शिंदे यांनी हा निवाडा दिला. सावंगी मेघे पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला होता. महाकाळ येथील अजाबराव श्यामराव  भोकटे हे ६५ वर्षीय शेतकरी ८ एप्रिल २०१९ रोजी सकाळी बकऱ्या चारण्यास घराबाहेर पडले होते. तेव्हा शेताकडील बंड्या जवळ जात असतांना आरोपी रणजित रामकृष्ण धवणे याने जुन्या रागातून भोकटे यांच्या डोक्यावर लोखंडी सळाखीने  सपासप वार केले. त्यात भोकटे जागीच बेशुद्ध पडले. त्यांच्यावर सेवाग्रामच्या रुग्णालयात उपचार झाले व सावंगी पोलिसात तक्रार झाली. जीवे मारण्याच्या उद्देशाने हा प्रकार घडल्याची तक्रार झाली. पूढे हे प्रकरण न्यायालयात आले. तेव्हा भरपूर पुरावा असल्याचे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता रश्मी सोमवंशी यांनी सिद्ध केले. त्यामुळे आरोपीस सजा ठोठावण्यात आली. दंड न भरल्यास तीन महिने सश्रम करावास भोगावा लागणार.