लोकसत्ता टीम

चंद्रपूर : सलग ४८ तास पाऊस झाल्याने जिल्ह्यातील नदी नाले तुडुंब भरले आहेत. अनेक नदीच्या पुलावरून पाणी वाहत आहे. अशातच वरोरा तालुक्यातील कोसरसार-बोडखा या पुलावरून पाणी वाहत असताना विद्यार्थांना वरोरा या तालुक्याच्या ठिकाणी जीव मुठीत ठेवून पुरातून जीवघेणा प्रवास करीत एका हातात पायाची चप्पल, पाठीवर दप्तरं आणि दुसऱ्या हाताची साखळी करून विद्यार्थी पुरातून मार्ग काढीत शाळेतून घरी व घरून शाळेत जावे लागत आहे. विद्यार्थ्यांचा हा व्हिडिओ व छायाचित्र समाज माध्यमावर सार्वत्रिक होताच सर्वत्र लोकप्रतिनिधी व जिल्हा प्रशासनावर टीका होत आहे.

44 students of class 5 to 6 of Thane Municipal School found to have poisoned by midday meal
दिव्यामधील महापालिका शाळेतील ४४ विद्यार्थ्यांना विषबाधा, शाळेतून देण्यात येणाऱ्या खिचडीत मृत पाल आढळली
17th October Rashi Bhavishya In Marathi
१७ ऑक्टोबर पंचांग: धनसंपत्ती की प्रचंड यश, गुरुवारी…
Girl Student suicide hostel Chembur, suicide Chembur,
मुंबई : चेंबूरमधील शासकीय वसतिगृहात विद्यार्थिनीची आत्महत्या
auto driver lured 12th grade student aware she was minor and abducted her
ऑटोचालकाने शाळकरी विद्यार्थीनाली पळवले अन् …
A case has been registered against those who molested three female students near a school in Wadala Mumbai news
वडाळ्यातील शाळेजवळ तीन विद्यार्थिनींची छेड काढणाऱ्याविरोधात गुन्हा
Sandalwood theft in a society on Law College Road
विधी महाविद्यालय रस्त्यावरील सोसायटीत चंदन चोरी, चंदनाची झाडे कापून नेण्याच्या घटना वाढीस
pune bopdev ghat gangrape
पुणे: कोंढव्यातील बोपदेव घाटात महाविद्यालयीन तरुणीवर सामूहिक बलात्कार
students poisoned school Kalwa, Thane,
ठाणे : कळव्यामधील एका शाळेतील ३८ विद्यार्थ्यांना विषबाधा

सलग दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसानंतर विद्यार्थ्यांचा हा व्हिडिओ समोर आला आहे. विशेष म्हणजे शाळेत जात असताना सर्व विद्यार्थी एका हातात पायाची चप्पल, पाठीवर दप्तरं आणि दुसऱ्या हाताची साखळी करून पुरातून मार्ग काढीत आहे. हे विध्यार्थी वरोरा तालुक्यातील बोडखा मोकाशी गावातील आहेत. शिक्षणासाठी त्यांना वरोरा या तालुक्याच्या ठिकाणी दररोज जावं लागतं. जिल्हातील कोसरसार ते बोडखा मार्गावरील नदीवर जुना पूल आहे. या पुलावरूनच मागील पंचवीस वर्षांपासून बोडखा ग्रामस्थ ये जा करतात. पुल लहान असल्याने मोठा पाऊस आला की काही तासातच पुलावरून पाणी पाणी वाहू लागतंय. बोडखा मोकाशी गावाला ये जा करण्यासाठी हा एकमेव मार्ग असल्याने भर पुरातुन त्यांना मार्ग काढीत जावे लागते. येथील विद्यार्थी कोसरसार व वरोरा येथील शाळेत शिक्षण घेतात. पावसाळ्यात विध्यार्थ्यांना पुरातून जीवघेणा प्रवास करावा लागतो. या नदीवर नव्या पुलाची निर्माती करावी अशी मागणी वारंवार गावकऱ्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधी व जिल्हा प्रशासन यांच्या जवळ केली आहे. मात्र त्यांचा मागणीकडे कुणीही गांभीर्याने बघितले नाही.

आणखी वाचा-आजी-माजी गृहमंत्र्यांमध्ये कलगीतुरा; ठाकरेंना तुरुंगात टाकण्याचा फडणवीसांचा डाव देशमुख

चंद्रपूर जिल्ह्यात मागील चार दिवसापासून संततधार सुरू आहे. या पावसामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत. नदी नाल्यांना आलेल्या पुरामुळे शेकडो घरांची पडझड तर हजारो हेक्टर शेतीचे नुकसान झालेले आहे. गेल्याच आठवड्यात नागभीड तालुक्यात पाचव्या वर्गात शिकणाऱ्या एका दहा वर्षीय विद्यार्थ्यांचा पुल पार करताना पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने मृत्यु झाला. मुलाच्या मृत्युची घटना नुकतीच घडली असताना विद्यार्थ्यांचा असा व्हिडिओ समोर आल्याने जिल्हा प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्यावर टीका होत आहे. पंचवीस वर्षांत एखाद्या भागात पुल होत नसेल तर असे लोकप्रतिनिधी काय कामाचे असाही प्रस्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान सलग ४८ तास पाऊस झाल्याने जिल्ह्यातील नदी नाल्याना पूर आलेला आहे. इरई धरणाचे सात दरवाजे उघडले आल्याने नदी काठावरील वस्त्याना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पूर पाहायला जाणाऱ्या लोकांनी स्वतःची काळजी घ्यावी असेही आवाहन करण्यात आले आहे.