देवेश गोंडाणे

नागपूर : यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठांतर्गत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘पुस्तके घरपोच’ सेवा सुरू केली होती. इतर सामान्य महाविद्यालयांच्या परीक्षा संपण्यात जमा आहे. तर मुक्त विद्यापीठाच्या परीक्षा तोंडावर आल्या असताना अद्यापपर्यंत मुक्त विद्यापीठाच्या काही अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना पुस्तके मिळालेली नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांची पुस्तकांविना फरपट होत असून विद्यापीठाने त्यांच्या ‘ज्ञानगंगा घरोघरी’ या ब्रीद वाक्याला बगल दिली आहे.

PM Vidyalakshmi Scheme
उच्च शिक्षण घेऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांना मिळणार १० लाखांपर्यंत शैक्षणिक कर्ज; काय आहे ‘पंतप्रधान विद्यालक्ष्मी योजना’?
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
10th student commits suicide before pre-examination
पूर्वपरीक्षेपूर्वी दहावीतील विद्यार्थिनीची आत्महत्या
AMU minority status upheld 1967 decision quashed by Supreme Court
‘एएमयू’चा अल्पसंख्याक दर्जा कायम, १९६७ चा निर्णय सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द; नियमित खंडपीठात सुनावणी
Supriya Sule asked why the investigative agencies are misusing power
सत्तेचा गैरवापर करून तपास यंत्रणांचा ससेमिरा कशासाठी; सुळे यांचा सवाल
Book Self discovery in space Science
बुकरायण: अंतराळातला आत्मशोध
TET, AI, TET malpractices, TET news, TET latest news,
‘टीईटी’वर आता एआय ठेवणार नजर… गैरप्रकार रोखण्यासाठीच्या उपाययोजना काय?
MPSC Mantra State Services Main Exam Science and Technology
MPSC मंत्र: राज्यसेवा मुख्य परीक्षा; विज्ञान व तंत्रज्ञान

करोना काळानंतर मुक्त विद्यापीठातर्फे विद्यार्थ्यांना नियमित पुस्तके दिली जात नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. मुक्त विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना घरपोच पुस्तके मिळावी या पाश्र्वभूमीवर ‘घरपोच पुस्तके’ देण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला होता. मात्र, त्याचा लाभ मिळताना दिसत नाही. नोकरी करीत असताना गुणवत्ता, शिक्षणातील पात्रता वाढवणे, ‘इंक्रिमेंट’ वाढवणे शिवाय ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांचे शिक्षण अपूर्ण राहिलेले असल्यास त्यांना शिक्षणाची संधी मुक्त विद्यापीठातून मिळते. ‘ज्ञानगंगा घरोघरी’ असे या विद्यापीठाचे ब्रीद आहे. मात्र, ज्ञान देणारी पुस्तकेच विद्यार्थ्यांना मिळत नसल्याचे चित्र सध्या उमटले आहे.

मुक्त विद्यापीठाच्या अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यापीठामार्फत पुस्तके उपलब्ध करून दिली जातात. त्यासाठी विद्यार्थ्यांकडून शुल्क आकारले जाते. प्रत्येक सत्रासाठी पुस्तकांचा संच विद्यापीठामार्फत दिला जातो. परंतु, यंदा अनेक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना सहापैकी तब्बल पाच पुस्तके विद्यापीठाने दिलेली नसून, केवळ एकच पुस्तक उपलब्ध करून देण्यात आल्याची बाब समोर आली आहे.

मग पुस्तकांचे शुल्क का?
मुक्त विद्यापीठातर्फे प्रवेश शुल्कासोबत पुस्तकांसाठी वेगळे शुल्क आकारले जाते. मात्र, हल्ली प्रशासनाने सर्वच अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना पुस्तके न देता काही प्रमाणपत्र अभ्यासक्रमांना पुस्तकांची ‘पीडीएफ’ देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. परंतु, विद्यार्थ्यांना ‘पीडीएफ’ दिली जात असेल तर पुस्तकांच्या नावाने शुल्क वसुली का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

विद्यापीठाच्या परीक्षा सुरळीत सुरू असून विद्यार्थ्यांना पुस्तकांचा कुठलाही तुटवडा नाही. सर्व अभ्यासक्रमाच्या पुस्तका उपलब्ध करून दिल्या आहेत. काही अभ्यासक्रमाच्या पुस्तका या ‘पीडीएफ’ स्वरूपात देण्यात आल्या आहेत. विद्यापीठाचा आणि विद्यार्थ्यांचा खर्च वाचवण्याच्या दृष्टीने प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. दुर्गम भागातील विद्यार्थ्यांपर्यंतही ‘ई पुस्तका’ पुरवल्या जाव्या या हेतूने हा निर्णय घेतला आहे.
-भटूप्रसाद पाटील, प्रभारी कुलसचिव व परीक्षा नियंत्रक, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक.