नागपूर : लोकसत्ता लोकांकिका स्पर्धेत संवादातील बदलापासून ते संगीत नियोजनातील बदल सहज आणि सोप्या पद्धतीने स्पष्ट करुन परिक्षक सांगत असल्यामुळे पुढील स्पर्धेसाठी अधिक जोमाने तयारी करण्यास प्रोत्साहन मिळते.यामुळेच लोकसत्ता लोकांकिका ही स्पर्धा इतर स्पर्धांपेक्षा खूप आगळीवेगळी ठरते, अशी प्रतिक्रिया प्राथमिक फेरीतून विभागीय अंतिम फेरीसाठी निवड झालेल्या महाविद्यालयातील रंगकर्मी विद्यार्थ्यांनी दिली.

रंगकर्मी विद्यार्थ्यांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेची नागपूर आणि अमरावती विभागीय प्राथमिक फेरी रविवारी आणि सोमवार बअसे दोन दिवस पार पडली. या स्पर्धेत विविध सामाजिक विषयांवर भाष्य करणाऱ्या एकांकिका महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सादर केल्या. या प्राथमिक फेरीतून नागपूर विभागीय अंतिम फेरीसाठी पाच महाविद्यालयांची निवड करण्यात आली. त्यांनी अंतिम फेरी आज गुरुवारी होत आहे. ललित कला विभागाच्या ‘थेंब थेंब स्वास’ नाटकाने स्पर्धेला सुरुवात झाली. समृद्ध करणारा नवा अनुभव लोकसत्ता लोकांकिकामध्ये अनेक गोष्टी शिकायला मिळतात.

ajith kumar team won dubai car race 2
सरावादरम्यान क्रॅश झाली होती कार, तरीही जिंकली दुबईतील स्पर्धा; ‘या’ दाक्षिणात्य सुपरस्टारवर कौतुकाचा होतोय वर्षाव
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Representative Image
“मी अभ्यास करू शकत नाही, हे माझ्या आवाक्याबाहेर…” कोटामध्ये IIT प्रवेश परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या
upsc exam preparation tips,
यूपीएससीची तयारी : सीसॅट पेपर
Champions Trophy 2025 All Venues in Pakistan Lahore Rawalpindi Karachi Are Still Not Ready Tournament Could Shift to UAE
Champions Trophy: पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीची हौस भारी; पण स्टेडियम्स बांधून तयारच नाही, यजमानपद दुबईकडे जाण्याची शक्यता
Technology Exponential Technology Linear Technology
पहिले पाऊल: आघातांकीय!
farewell ceremony shocking video
हे घडवणार उद्याचं भविष्य! शाळेच्या फेअरवेल पार्टीत विद्यार्थ्यांची कारबरोबर जीवघेणी स्टंटबाजी अन् हवेत गोळीबार; थरारक VIDEO Viral
bjp devendra fadnavis stand on dhananjay munde resignation as minister post
धनंजय मुंडे यांचे मंत्रिपद भाजपवर अवलंबून

हेही वाचा…संसर्गजन्य आजारावर प्रभावी उपाय: नागपुरात मेट्रोपोलीटन सर्वेलन्स युनिट…

नवा अनुभव मिळत असल्याने कलाकार घडत जातो. आज आमचे विद्यार्थी लोकसत्तामुळे दिग्दर्शन आणि लेखन करू शकतात. सुमेध कावणे, शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालय अकोला. कलावंत घडवणारा उपक्रम लोकसत्ताचा हा छान उपक्रम आहे. उद्याचे कलाकार यातून घडणार आहेत. केवळ नटच नाही तर लेखक आणि दिग्दर्शक घडवणारे हे व्यासपीठ आहे. विद्यार्थ्यांनी दरवर्षी यात सहभागी व्हावे.

प्रा. अविनाश दारशिंबे, श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय, अमरावती.दरवर्षी वाट बघत असतो या स्पर्धेची आम्ही दरवर्षी वाट बघत असतो. यंदा तयारीला थोडा कमी वेळ मिळाला. मात्र, आपण नाटकांमध्ये काम करताना कुठले बारकावे जपावे यासाठी ही स्पर्धा मार्गदर्शक ठरते. शरयू गावंडे, अमरावती.

हेही वाचा…भंडारा : वाघाला चक्क गावकऱ्यांनीच घेरले अन…

विद्यार्थ्यांसाठी पर्वणी

लोकसत्ता लोकांकिकेमुळे विद्यार्थ्यांना चांगली संधी मिळते. आमच्या विद्यार्थ्यांसाठी तर ही पर्वणी आहे. अशा स्पर्धांमधून त्यांना अनेक नव्या गोष्टी शिकता येतात. नितीन चक्रे, अमरावती इतर कलावंतांच्या अभिनयाचे दर्शन राज्यभर होणारी ही स्पर्धा आम्हाला अनेक गोष्टी शिकवून जाते. दरवर्षी आम्ही लोकांकिका स्पर्धेची वाट बघत असतो. अन्य कलाकारांच्या नाटक बघून अनेक गोष्टी शिकताही येतात. तनय रोठे, अमरावती.

प्रायोजक

मुख्य प्रायोजक : जवाहरलाल नेहरू प्राधिकरण

सहप्रस्तुती : सॉफ्ट कॉर्नर

सहप्रायोजक : झी टॉकिज, केसरी टूर्स

पॉवर्ड बाय : एन. एल. दालमिया

सहाय्य : अस्तित्व

टॅलेंट पार्टनर : आयरिस प्रोडक्शन्स

Story img Loader