लोकसत्ता टीम

नागपूर: सामाजिक न्याय विभागाच्या वतीने अनुसुचित जातीच्या गुणवंत विद्यार्थीसाठी परदेशात उच्चशिक्षणासाठी दिली जाणारी शिष्यवृत्ती अर्ज करण्याची मुदत आज संपली आहे. मात्र, अनेक विद्यार्थ्यांकडून अद्यापही कागदपत्रांची पुर्तता झालेली नसल्याने अर्ज करण्यासाठी थोड्या दिवसांची मुदत देण्यात यावी अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे.

परदेशी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची मुदत ही २० जूनपर्यंत आहे. कागदपत्राची पुर्तता काही विद्यार्थींकडून अजूनही पूर्ण झाली नाही. तसेच काही विद्यार्थ्यांचे परदेशातील विद्यापीठाचे निवडपत्र येणे बाकी आहे. साधारणपणे परदेशात प्रवेश घेतल्यानंतर एक ते दिड महिन्यांनी प्रवेश पक्के झालेल्याचे पत्र येते. अनेक विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊनही त्यांचे पत्र न आल्याने त्यांना शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यात अडचण येत आहे.

हेही वाचा… अमरावती: १३ लाखांच्‍या बक्षीसाचे प्रलोभन दाखवून लुबाडले ३२ हजार रुपये

परदेशी विद्यापीठात प्रवेश मिळूनही केवळ कागदपत्रांच्या पुर्ततेमुळे विद्यार्थ्यांना अर्ज करता येत नसल्याने शासनाने याची दखल घेऊन अर्जासाठी मुदतवाढ द्यावी अशी मागणी कुलदीप आंबेकर यांनी केली.

Story img Loader