देवेश गोंडाणे

नागपूर: महाराष्ट्रातील पहिल्या आणि एकमेव भारतीय व्यवस्थापन संस्था ‘आयआयएम-नागपूर’कडे विद्यार्थ्यांचा कल वाढत असल्याचे चित्र आहे. मात्र, देशातील आणि नागपूरातील आयआयएमच्या शुल्कावर नजर फिरवली असता याचे शुल्क सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचे आहे. माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीनुसार,‘आयआयएम-नागपूर’ने सात वर्षांत पाच वेळा वाढ केली आहे. मात्र, शुल्क वाढीची कारणे देण्यास संस्थेने नकार दिला आहे.

principal suspended for negligence in duty in midday meal food poisoning case pmd
वर्धा : कर्तव्यात कसुर; मुख्याध्यापक निलंबित; शालेय पोषण आहार विषबाधा प्रकरण
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
state government decision 50 thousand teachers will get 20 percent subsidy increase
शिक्षकांसाठी मोठी बातमी! वेतनात २० टक्के वाढ होणार?
academic degree on experience
विश्लेषण : अनुभवाच्या आधारे पदवी कशी मिळणार?
NEET Postgraduate Exam Schedule Announced Wardha news
नीट पदव्युत्तर परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; वैद्यक आयोग म्हणतो…
Property tax defaulters properties seized in Titwala
टिटवाळा येथे कर थकबाकीदारांच्या दोन कोटीच्या मालमत्तांना टाळे, पालिकेच्या अ प्रभागाची कारवाई
anti-ragging rules, non-compliance of anti-ragging rules, National Medical Commission,
रॅगिंगविरोधी नियमांचे पालन न केल्यास कठोर कारवाई, राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाचा वैद्यकीय महाविद्यालयांना इशारा
Satish Wagh murder case, Pune police, Pune ,
सतीश वाघ हत्या प्रकरण : नवनाथ गुरसाळे आणि पवन शर्मा दोन आरोपींना अटक अन्य आरोपींचा शोध सुरू

 आयआयएम-नागपूर’ची स्थापना २०१५ साली झाली. पहिल्या वर्षी दहा लाख रुपये इतके शुल्क होते. मात्र टप्प्याटप्प्याने दरवर्षी शुल्क वाढ करण्यात आली आहे. अधिवक्ता संगीता थूल यांनी दाखल केलेल्या ‘आरटीआय’च्या उत्तरानुसार, २०१५ मध्ये ‘आयआयएम-नागपूर’मधील पदवी अभ्यासक्रमाचे शुल्क १० लाख रुपये होत. त आज १३ लाख ७५ हजार रुपये झाले आहे. मात्र, शुल्क वाढीची कारणे सांगणे हे सार्वजनिक हिताचे नाही असे सांगत ‘आयआयएम-नागपूर’ने उत्तर देण्यास नकार दिला आहे. २०१५-१७ या वर्षात आयआयएमचे शुल्क १० लाख रुपये शुल्क, २०१६-२०१८ या सत्रात १०.७८ लाख झाले. २०१७-१९ मध्ये ११ लाख तर २०१८-२० मध्ये ११.५ लाख, २०१९-२१ मध्ये १२.५ लाख तर २०२०-२२ मध्ये १३.७५ लाख आणि २०२१-२३ मध्ये १३.७५ लाख रुपये आहे. मात्र, या शुल्क वाढीवर माहिती अधिकार कार्यकर्त्या ॲड. थूल यांनी आक्षेप घेत सध्या संस्थेचे शुल्क खूप असून व्यवस्थापनाने कोणत्या आधारावर शुल्क वाढ केली आहे, हे सांगावे. ही बाब जनहिताची नाही, असे सांगून टाळता येणार नाही, असे सांगितले.

अशा आहे शिष्यवृत्ती योजना

२०२२-२४ या शैक्षणिक वर्षापासून ‘आयआयएम’ने गरीब व गुणवंत विद्यार्थ्यांसाठी विशेष पुढाकार घेतला असून दोन वेगवेगळ्या शिष्यवृत्तींमधून २० विद्यार्थ्यांना लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय येथे प्रवेशित अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय अधिछात्रवृत्ती व शिष्यवृत्तीचेदेखील पर्याय आहेत. झारखंडमधील विद्यार्थ्यांना मुख्यमंत्री फेलोशीप योजना तर राज्यातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्तीचा लाभ मिळू शकतो. याशिवाय कॉर्पोरेट्स आणि खाजगी संस्थांद्वारे प्रदान केलेल्या शिष्यवृत्तीची सुविधा देखील उपलब्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

इतर ‘आयआयएम’मध्ये आहे असे शुल्क

आयआयएम-रोहतक – १६.१० लाख

आयआयएम-काशीपूर – १५.४२ लाख

आयआयएम-त्रिची – १६.५० लाख

आयआयएम अहमदाबाद – २३ लाख

आयआयएम बंगळुरू – २३ लाख

आयआयएम-कोलकाता – २७ लाख

आयआयएम-लखनौ – १९.२५ लाख

आयआयएम-कोझिकोड – २२.५० लाख

आयआयएम-इंदोर – २०.०६ लाख

आयआयएम-शिलॉंग – सुमारे १४.५० लाख

आयआयएम-रायपूर – १४.२० लाख

आयआयएम-रांची – १६.३० लाख

आयआयएम-उदयपूर – १७.९० लाख

आयआयएम-अमृतसर – १३.२० लाख

आयआयएम-बुद्धगया – १२.९५ लाख

आयआयएम-संबलपूर – १३.०३ लाख

आयआयएम-सिरमौर – ११.७५ लाख

आयआयएम-विशाखापट्टणम – १६.५९ लाख

आयआयएम-जम्मू – १५.५६ लाख

Story img Loader