चंद्रपूर : गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाचे उपकेंद्र आता चंद्रपुरात उभे राहणार आहे. त्यासाठी ८.५३ एकर जागा मंजूर करण्यात आली आहे. या विद्यापीठाच्या उपकेंद्राकरिता शासनाने मान्यता दिली आहे. विशेष म्हणजे, श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी (एसएनडीटी) महिला विद्यापीठाचे उपकेंद्र बल्लारपूर-चंद्रपूर मार्गावर तयार होत असताना आता गोंडवाना विद्यापीठाचे उपकेंद्रही चंद्रपुरात होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिक्षणासोबतच कौशल्य विकासावर वन व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा भर आहे. त्यांच्याच पाठपुराव्यामुळे दोन विद्यापीठांचे उपकेंद्र जिल्ह्याला मिळत आहे.

हेही वाचा – नागपुरात ‘सी-२०’ च्या नावावर रोषणाईसाठी महिन्याला १.८५ लाख युनिट खर्च

जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना गोंडवाना विद्यापीठाचे मुख्यालय भौगोलिक अंतरामुळे लांब पडत होते. यासंदर्भात मुनगंटीवार यांनी उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांना डिसेंबर २०२२ मध्ये पत्र पाठवून गोंडवाना विद्यापीठाचे उपकेंद्र चंद्रपुरात स्थापन करण्याबाबत सूचना केली होती. मुनगंटीवार यांचे पत्र प्राप्त होताच उच्च व तंत्रशिक्षण विभाग, गोंडवाना विद्यापीठ प्रशासन कामाला लागले. चंद्रपूर शहरातील बाबुपेठ मोहल्ला येथील मोकळी जागा उपकेंद्र स्थापन करण्याच्या दृष्टीने उपलब्ध असल्याचे उपअधीक्षक, भूमी अभिलेख कार्यालय, चंद्रपूर यांनी नमूद केले आहे. त्यानुसार ही जागा गोंडवाना विद्यापीठाच्या चंद्रपूर उपकेंद्रासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

हेही वाचा – चंद्रपूर : धानोरकर यांना कमकुवत करणाऱ्यांना विसरणार नाही, श्रद्धांजली सभेत आमदार प्रतिभा धानोरकर यांचा विरोधकांना इशारा

चंद्रपूर जिल्ह्यात १५ तालुक्यांचा समावेश आहे. १३३ महाविद्यालये गोंडवाना विद्यापीठाशी संलग्न आहेत. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना विद्यापीठात जाण्यासाठी मोठे अंतर पार करावे लागत होते. आता चंद्रपुरातच उपकेंद्र स्थापन होणार असल्याने विद्यार्थ्यांचा त्रास वाचेल. यामुळे विद्यार्थ्यांनी मुनगंटीवार यांचे आभार मानले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sub centre of gondwana university in chandrapur 8 53 acres of land approved rsj 74 ssb
Show comments