अकोला : शेतातील किडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या कीटकनाशक अप्रमाणित असल्याचे आढळले. या प्रकरणात संबंधित कंपनीवर दंडात्मक कारवाई करण्यात आली शेतातील विविध पिकांवरील कीड नष्ट होण्यासाठी कीटकनाशकांचा मोठ्या प्रमाणात वापरल होतो. कृषी उत्पादकता वाढीमागील कीटकनाशक हा एक प्रमुख घटक असल्याचा दावा केला जातो. कीटकनाशक दोन प्रमुख गटांमध्ये विभागली जाऊ शकतात. त्यामध्ये अंतरप्रवाही किंवा दैहिक कीटकनाशकांचा समावेश होतो. ज्यात अवशिष्ट किंवा दीर्घकालीन क्रिया असतात. स्पर्शजन्य कीटकनाशक, ज्यात अवशिष्ट क्रिया नाही. कीटकनाशकांची फवारणी हे प्रामुख्याने शेतकरी आपल्या शेतात करतात. त्यामुळे त्यांचे प्रमाण हे शासनाने ठरवून दिले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अधिक प्रमाणात कीटकनाशक फवारणी केली जाते. मात्र, त्याचा विषारी प्रभाव हा पिकांवर पडतो. शेतातील पिकांची नासाडी होते. त्यामुळे अप्रमाणित कीटकनाशके वापरू नये, अशी सूचना वारंवार कृषी विभागाकडून दिली जाते.दरम्यान, अकोला जिल्ह्यातील एका कंपनीकडून वितरीत होणारे कीटकनाशक अप्रमाणित असल्याचा अहवाल फरीदाबाद येथील केंद्रीय कीटकनाशक कंपनीने दिला असल्याचा धक्कादायक अहवाल समोर आला. त्यानुसार मुख्य न्याय दंडाधिकारी यांनी संबंधित कंपनीला ८० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. गत खरीप हंगामात ८ जून २०२४ रोजी कीटकनाशके वितरीत करणाऱ्या व्हीएसपी क्रॉप सायन्स या ट्रान्सपोर्टनगर (येवता) परिसरातील कंपनीत कृषी पथकाने तपासणी केली. त्यात आढळलेल्या व्ही. जे. क्रॉप सायन्स कंपनी उत्पादित कीटकनाशकाचा नमुना तपासणीसाठी अमरावती येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आला. त्यात ते अप्रमाणित असल्याचे आढळून आले. पुन्हा तपासणी करण्यासाठी फरीदाबाद येथील केंद्रीय कीटकनाशक प्रयोगशाळेलाही नमुना पाठविण्यात आला. त्यातही हे कीटकनाशक अप्रमाणित असल्याचे आढळून आले. अहवालानुसार मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी कंपनीला ८० हजारांचा दंड ठोठावला आहे.

अप्रमाणित कीटकनाशक रोखण्याचे आव्हान

बाजारपेठेमध्ये विक्री होणारे अप्रमाणित कीटकनाशके रोखण्याचे मोठे आव्हान कृषी विभागापुढे उभे ठाकले आहे. शेतकऱ्यांना चांगल्या प्रतीचे खत, बियाणे, कीटकनाशक मिळावे, यासाठी भरारी पथकांमार्फत तपासणी करण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा कृषी विकास अधिकारी डॉ. तुषार जाधव व महेंद्र साल्के यांनी दिली.