लोकसत्ता टीम

नागपूर: कुही गावातील शेतकरी कुटुंबात पहिल्यांदाच पाळणा हलणार, म्हणून सर्व आनंदात होते. परंतु, अतिरक्तस्त्रावामुळे सहाव्या महिन्यातच महिलेची प्रसूती झाली. बाळाचे वजन ६०० ग्रॅम होते. त्याचे फुफ्फुसही विकसित नव्हते. परंतु डॉ. प्रवीण खापेकर यांच्या उपचाराने मुलाला वाचवण्यात यश मिळाले.

किरण थोटे आणि सुनील थोटे असे मुलाच्या आई- वडिलांचे नाव आहे. महिलेला उच्च रक्तदाबाचा त्रास होता. दरम्यान, अचानक रक्तस्त्राव सुरू झाला. यामुळे डॉक्टरांना तातडीने प्रसूती करावी लागली. यावेळी मुलाचे वजन केवळ ६०० ग्रॅम होते. बाळाला श्वास घ्यायला त्रास होत होता. संबंधित रुग्णालयाने बाळाला इतर रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला. दुसऱ्या खासगी रुग्णालयात बाळाला जीवनरक्षण प्रणालीवर ठेवले गेले.

हेही वाचा… नागपूर : चित्त्यांच्या मृत्यूने न्यायालय चिंतेत.. म्हणाले, तत्काळ पर्यायी ठिकाणी हलवा!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रकृती खालावत असल्याने बाळाला रामदासपेठेतील आस्था रुग्णालयात हलवले गेले. डॉ. खापेकरांनी औषधोपचारासोबत चौथ्या दिवशीपासून आईचे दूध ट्यूबद्वारे सुरू केले. हळूहळू दुधाचे प्रमाण वाढवून सामान्य केले गेले. पोषण आहारावर विशेष लक्ष देत उपचाराने मुलाला वाचवण्यात यश मिळाले.
वेळेपूर्वी जन्मलेल्या कमी वजनाच्या बाळांना आक्रमक पोषणासह विशेष काळजीची गरज पडते. आईचे दूध फीडिंग ट्यूबद्वारे दिले. संक्रमण होऊ नये म्हणून काळजी घेतली. सध्या त्याची प्रकृती उत्तम आहे, असे डॉ. खापेकर यांनी सांगितले.