लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वर्धा: महानगरातच उपलब्ध असणारी सेवा ग्रामीण भागात प्रथमच उपलब्ध झाली आहे. सावंगी येथील मेघे अभिमत विद्यापीठाच्या सिद्धार्थ गुप्ता मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल येथे ४८ वर्षीय स्त्री रुग्णावर स्तन प्रत्यारोपण व पुनर्रचनेची ही सुघटन शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

आकस्मिक दुर्घटना, अपघात, भाजणे किंवा स्तनांच्या कर्करोगावरील उपचारानंतर शरीरावर उणीवा निर्माण होतात. त्याची पूर्तता, पुनर्रचना आणि सौंदर्यीकरण करणारी ही शस्त्रक्रिया डॉ.फिरोज राजीव बोरले व चमूने केली. डॉ.बोरले यांनी टाटा मेमोरियल हॉस्पिटल मधून प्लास्टिक अँड रिकाँस्त्रॅक्टिव सर्जरीत पदवी प्राप्त केली असून सूक्ष्म रक्तवाहिन्यांची पुनर्रचना करणाऱ्या हजाराहून अधिक शस्त्रक्रिया त्यांनी केल्या आहेत.

आणखी वाचा-हृदयातील गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया आता नागपुरातच

स्तनांच्या पुनर्रचनेसाठी अद्यावत समजल्या जाणारी एएलटी फ्री फ्लॅप शस्त्रक्रिया सावंगी प्रथमच करण्यात आल्याची माहिती कर्करोग रुग्णालयाचे संचालक डॉ.नितीन भोला यांनी दिली. या सेवेमुळे ग्रामीण भागातील रुग्ण पण माफक दरात असे उपचार घेवू शकतील, असे ते म्हणाले. डॉ. भूषण जाजू व डॉ. अमोल सिंघम तसेच अन्य तंत्रज्ञाचे यात सहकार्य लाभले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Successful breast augmentation surgery pmd 64 mrj