लोकसत्ता टीम
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
नागपूर : काटोलमधील सोनखांब परिसरात एक ३० वर्षीय व्यक्ती रेल्वेतून खाली पडला. चेहरा विस्कटलेल्या अत्यवस्थ अवस्थेत लोहमार्ग पोलिसांनी त्याला प्रथम रेल्वे रुग्णालय व त्यानंतर नागपुरातील मेडिकलशी संलग्नित ट्रामा केअर सेंटरमध्ये दाखल केले. यशस्वी शस्त्रक्रियेतून तो बरा झाला. त्याने पत्ताही सांगितला असून लवकरच त्याला घरी पाठवले जाणार आहे.
वीरकमल श्याम मांझी (३०) रा. बैतुल असे जीवनदान मिळालेल्या रुग्णाचे नाव आहे. तो मजूर असून पोटाची खडगी भागवण्यासाठी काटोल परिसरात आला होता. सणासुदीच्या निमित्ताने गावाकडे जात असताना रेल्वेतून पडल्यामुळे तो जखमी झाला. त्याचे आईवडील हयात नाहीत, एक भाऊ आहे. पोलिसामार्फत त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.
आणखी वाचा-आतापर्यंत समजूतदारपणाच; मग आता नांगर फिरवता की काय? मनोज जरांगे-पाटील यांचा सवाल
दरम्यान, मेडिकलच्या सामाजिक अधीक्षक कार्यालयाकडून रुग्णाला उपचार पूर्ण झाल्यावर रीतसर घरी पाठवण्याचीही सोय केली जाणार आहे. मेडिकलमधील सामाजिक अधीक्षक कार्यालयाच्या माहितीनुसार, १० ऑक्टोबरच्या सकाळी ६ वाजता एका धावत्या रेल्वेतून पडल्याने ३० वर्षीय चेहरा विस्कटलेला अत्यवस्थ व्यक्ती लोहमार्ग पोलिसांना आढळला. तातडीने त्याला प्रथम रेल्वे व त्यानंतर नागपुरातील मेडिकलच्या ट्रामा केअर सेंटरला हलवले गेले. रुग्णाच्या चेहऱ्याची उजवी बाजू पूर्णपणे फाटली होती.
वैद्यकीय अधिकारी डॉ. नमिता कोवरते यांनी रुग्णाची माहिती घेत त्याला प्रथमोपचार दिले. येथील डॉ. विकास मेश्राम यांच्या नेतृत्वाखाली डॉ. प्रणाली निमोणकर व डॉ. कायनात खान या मुख शल्यचिकित्साशास्त्र वैद्यकीय चमूने तातडीने रुग्णावर गुंतागुंतीची व क्लिष्ट शस्त्रक्रिया केली. याप्रसंगी डॉ. सोमा चाम यांच्या नेतृत्वात बधिरीकरण शास्त्र विभागाच्या डॉ. संगावार डॉ. प्रणाली या चमूचीही भूमिका महत्त्वाची होती. तर समाजसेवा अधीक्षक यांनी रुग्णास वारंवार भेटी देऊन त्याची ओळख पटवण्यासाठी प्रयत्न केले. सगळ्यांच्या सामूहिक प्रयत्नाला यश आल्याने बरा झालेला रुग्ण लवकरच आपल्या घरी पोहचणार आहे.