लोकसत्ता टीम
भंडारा: उपजिल्हा रुग्णालय साकोली येथे प्रसुती झाल्यानंतर अचानक तब्येत बिघडल्याने वीस तासाच्या आत प्रसुती झालेल्या महिलेचा मृत्यू झाला. वनिता विजय भीवगडे ,वय २३ वर्ष रा. मुंडीपार सडक असे मृत महिलेचे नाव आहे. रुग्णालयात घडलेल्या या दुर्दैवी घटनेनंतर संतप्त कुटुंबीयांनी व ग्रामस्थांनी रुग्णालय गाठले. काल दिवसभर रुग्णालय परिसरात शांततापूर्ण तणाव परिस्थिती निर्माण झाली होती. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे महिलेचा मृत्यू झाल्याने दोषी वैद्यकीय अधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित करावे या मागणीसाठी उपजिल्हा रुग्णालय प्रशासनाच्या विरोधात बराच वेळ पीडित कुटुंबीयांसह नागरिकांनी रुग्णालय परिसराचा घेराव केला.
आणखी वाचा-पुण्याला जाण्यासाठी ‘या’ गाडीला मिळाली मुदतवाढ; विदर्भ, मराठवाड्यातील प्रवाशांना मोठा दिलासा
तालुक्यातील ग्राम मुंडीपार सडक येथील निवासी वनिता विजय भीवगडे यांना २७ जूलै रोजी उपजिल्हा रुग्णालय साकोली येथे प्रसूती करिता दाखल करण्यात आले होते. २८ जुलै रोजी सकाळी दहा वाजून पंधरा मिनिटांनी डॉ . चारुलता गायधनी, डॉ .भास्कर गायधनी व डॉ.फैमिना अली व चमूने शस्त्रक्रिया करून वनिताची प्रसूती केली. प्रसूती झाल्यानंतर वनिता व नवजात बाळाची प्रकृती सामान्य होती. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार सगळं काही सामान्य असताना २९ जुलै रोजी पहाटे ३.३० वाजेच्या दरम्यान वनिताची प्रकृती अचानक खालावली हे लक्षात येताच कर्तव्यावर असलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ.फैमिना अली तसेच डॉ .चारुलता गायधनी, डॉ .भास्कर गायधनी यांनी उपचार सुरू केले. मात्र उपचारादरम्यान ५.४५ वाजता वनिताची प्राणज्योत मालवली. रुग्णालय गाठून कुटुंबीय व ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घेतले रुग्णालयातील चिघळलेली. वनिताच्या अचानक झालेल्या मृत्यूचे कारण शोधण्यासाठी शव उत्तरीय तपासणीसाठी नागपूर येथे पाठविण्याच्या निर्णय घेऊन फॉरेन्सिक लॅब नागपूर येथे शव पाठविण्यात आले. सदर घटनेत प्रथमदर्शनी वैद्यकीय अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा असल्याचे मत खासदार मेंढे यांनी व्यक्त करून दोषींवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन यावेळी दिले.
आणखी वाचा-नागपूर : कुख्यात गुंड चाकूसह चक्क न्यायालयात पोहचला….अन पुढे जे झाले ते….
वनिताचे पती विजय यांच्या म्हणण्यानुसार २८ जुलै रोजी वनिताची प्रसुतीनंतर ती शुद्धीवर आल्यानंतर तिच्या पोटात दिवसभर त्रास होत होता. ही बाब कर्तव्यावर असलेल्या वैद्यकीय डॉक्टर व परिचारिकेस सांगितल्यानंतर वळीच उपचार करण्यात आले नाही. नवजात शिशुची प्रकृती स्वस्थ व सामान्य असताना रात्री नऊ वाजेच्या दरम्यान कारण नसताना नवजात शिशुला रेफर स्लिप रुग्णालय प्रशासन कडून का देण्यात आली? माझ्या पत्नीचा मृत्यू कर्तव्यावर असलेल्या रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व परिचारिका यांच्या निष्काळजीपणामुळे झाल्याने दोषींवर योग्य कारवाई करण्यात यावी या मागणीचे निवेदन मृतक चे पती विजय भिवगडे यांनी जिल्हा शल्य चिकित्सक दीपचंद सोयाम ठाणेदार राजेश थोरात यांना दिले आहे.