नागपूर: देशात आणि राज्यात भाजप सत्तेत आल्यापासून अनेक मंत्री आणि पदाधिकारी भाजपची मातृसंस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबागेतील हेडगेवार स्मृती स्थळाला भेट देतात. सध्या मराठा आणि ओबीसींच्या आरक्षणाचा मुद्दा राज्यात गाजत आहे. शुक्रवारी राज्याचे गृहनिर्माण, इतर मागासवर्ग बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी रेशीमबागेतील डॉ. हेडगेवार यांच्या स्मृतीला अभिवादन केले. तसेच पदाधिकाऱ्यांशी भेट घेतल्याची माहिती आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

ओबीसी मंत्र्यांच्या संघभूमीतील भेटीने अनेक चर्चांना उधान आले आहे. अतुल सावे रेशीमबाग मैदानावर नॅशनल रियल इस्टेट डेव्हलपमेंट कॉन्सिल- (नरेडको) विदर्भ यांच्यावतीने आयोजित होमेथॉन प्रॉपर्टी एक्सपोचे उद्घाटन आणि महाज्योतीच्या संचालक मंडळाच्या बैठकीच्या निमित्ताने नागपुरात आले होते.