नागपूर : सरकार काम करणारे आणि संवेदनशील असते तेव्हा प्रत्येक समुहाला वाटते की तेथे न्याय मिळेल. जेथे न्यायाची अपेक्षा असते तेथे मागण्यांसाठी आंदोलन करायलाच हवे. महाविकास आघाडी सरकार केवळ परिवारासाठी काम करणारे होते, त्यामुळे त्यांना जनतेचे आणि विकासाचे प्रश्न महत्त्वाचे नव्हते. शिंदे-फडणवीस-अजित पवार सरकार प्रत्येक आंदोलनाची दखल घेत गंभीरपणे काम करत आहेत, असे मत वने, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले.

वनमंत्री मुनगंटीवार नागपुरात आले असता प्रसार माध्यमांशी बोलत होते. राज्यात मराठा, धनगर, ओबीसी आणि इतरही समाजाचे आंदोलन सुरू आहे. सरकार प्रत्येक समाजाबाबतीत संवेदनशील आहे. प्रत्येक आंदोलनाची सरकार दखल घेऊन त्यांना न्याय मिळवून देईल, असे मुनगंटीवार म्हणाले. एका बॅनरवर मुख्यमंत्र्याच्या नावावर हिंदूहृदय सम्राट लिहिले असले तरी ते त्यांनी लावलेले बॅनर नाही. कार्यकर्त्याची ती भावना आहे. एखादा कार्यकर्ता उत्साहात असतो. नगरसेवकांची लायकी नसेल तरीही कार्यकर्ता भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लावतो. त्यात व्यक्तीचा दोष असतो का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वर्गीय हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारासाठी इतकं मोठे पाऊल उचलले. त्यामुळे हिंदुत्वाचा हुंकार एकनाथ शिंदे, असे कार्यकर्त्याना वाटत असेल. त्यामुळे या फलकाचा एवढा बाऊ करून राजकारण करणे, याला काही अर्थ नाही, असेही मुनगंटीवार म्हणाले.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
Pune city Shiv Sena uddhav thackeray eknath shinde
शिवसेनेला पुणेकरांचा ‘जय महाराष्ट्र’?
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

हेही वाचा – चंद्रपुरातील पुरातन मंदिर, किल्ल्यांचे रुपडे पालटणार; ५८ कोटींचा निधी प्रस्तावित

हेही वाचा – अकोला जिल्ह्यात निवडणुकीची रणधुमाळी; आचारसंहिता लागू

मराठा आरक्षणाबाबत सरकार म्हणून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आदरपूर्वक बोलत आहेत. दोन समुहांत अंतर निर्माण होईल आणि एकमेकांपासून दुरावा निर्माण होईल, असे वक्तव्य कुणीही करू नये. विरोधी पक्षातील काही लोकांचे मात्र पोट दुखत आहे, आताच्या आता आरक्षण देण्याची मागणी ते करत आहेत. दोन्ही डब्यांवर हात ठेवून ते ‘हसिन सपने’ पाहत आहेत, अशी टीका त्यांनी नाव न घेता विजय वडेट्टीवार यांच्यावर केली.

Story img Loader