नागपूर : अमित शहा यांच्यासोबत झालेल्या बैठकीत अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्र्याबाबत ठरलेले नव्हते. त्यावेळी निवडणुकीसाठी एवढ्या जाहीर सभा व्हायच्या. त्या सर्व जाहीर सभेचे व्हिडीओ आहेत. नरेंद्र मोदी यांनी सभेत वारंवार देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री राहतील असे सांगितले होते. त्यामुळे उद्धव ठाकरे आता खोटे बोलत असून त्यांच्या विदर्भ दौऱ्याचा काही उपयोग होणार नाही, अशी टीका वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. ते नागपुरात बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

निवडणुकीनंतर फडणवीस मुख्यमंत्री होणार होते. मात्र, त्याचवेळी राष्ट्रवादीसोबत उद्धव ठाकरे यांची बैठक झाली आणि त्यात शरद पवारांनी त्यांना सांगितले की भाजपाच्या कमी जागा आहेत तर तुम्ही मुख्यमंत्रीपदाची मागणी करा आणि तेच त्यांनी केले. त्याचा फायदा उद्धव यांनी घेतला. निवडणुकीचे निकाल लागले तेव्हा भारतीय जनता पार्टीच्या १२० च्या वर जागा येणार नाहीत हे लक्षात आले. त्यानंतर त्यांच्या मनात बेईमानी सुरू झाली आणि त्यावर चर्चा झाली आणि महविकास आघाडी तयार झाली.

हेही वाचा – यवतमाळ : काळे झेंडे दाखवून केली पेरणी; शेतकरी, शेतमजूर एल्गार परिषदेकडून अनोखा निषेध

ज्यावेळी चर्चा झाली त्या ठिकाणी अमित शहा उपस्थित होते. त्यांनी अनेकदा सांगितले की आम्ही कुठलाही शब्द दिला नाही. एकनाथ शिंदे चाळीस आमदारांना घेऊन निघून गेले. नीलम गोऱ्हे यांनीसुद्धा तुमच्यावर विश्वास ठेवला नाही. अनेकजण अजूनही संपर्कात आहेत, असे मुनगंटीवार म्हणाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sudhir mungantiwar criticized uddhav thackeray saying uddhav thackeray is lying vmb 67 ssb
Show comments