चंद्रपूर: मद्यामुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत. मद्यविक्री दुकानांबद्दल नागरिकांच्या असंख्य तक्रारी आहेत. मात्र याकडे दुर्लक्ष करून राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संजय पाटील यांनी मद्यालये व बियर शॉपी परवाना वाटपाचा धडाका सुरू केला आहे.

याबाबत पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. यापुढे एकाही दारू दुकानाला परवानगी दिली तर याद राखा, अशा शब्दात पालकमंत्री मुनगंटीवार यांनी सर्व अधिकाऱ्यांसमक्ष अधीक्षक पाटील यांना खडसावले.

When and where will flood-affected Ektanagari residents be relocated
पूरग्रस्त एकतानगरीचे होणार स्थलांतर नक्की कधी आणि कुठे?
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
local body government
राज्यात पुन्हा योजना, उद्घाटनांचा धडाका
Health Department provided assistance to 2 5 lakh critically ill patients mumbai news
आरोग्य विभागाने अडीच लाख दुर्धर आजाराच्या रुग्णांना दिला मदतीचा हात! पॅलिएटीव्ह सेवेचा करणार विस्तार…
Tuberculosis awareness campaign for 100 days in Nashik district
नाशिक : जिल्ह्यात शंभर दिवसांसाठी क्षयरोग जागृती मोहीम
eknath khadse devendra fadnavis
उलटा चष्मा : पांढरे निशाण…
restoration work of Tuljabhavani temple is underway under supervision of Archaeological Department
तुळजाभवानी मंदिराला मिळणार पुरातन झळाळी, जीर्णोध्दाराचे काम पुरातत्व खात्याच्या निगराणीखाली वेगात सुरू
Bhajepar gram panchayat won over 1 crore in prizes under various government schemes
गावकऱ्यांच्या परिश्रमाने ग्रामपंचायत झाली कोट्यधीश…

जिल्हा नियोजन भवन येथे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पोलीस तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाची बैठक बोलावली होती. या बैठकीला जिल्हाधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी, उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संजय पाटील यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. दारूबंदी उठवल्यानंतर जिल्ह्यात मद्यालये व बियर शॉपी परवाने देण्याचा धडाका अधीक्षक पाटील यांनी सुरू केला आहे.

हेही वाचा… वर्धा: पित्यानेच केली मद्यपी मुलाची हत्या; आत्महत्येचा बनाव

पाटील यांच्या विरोधात उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री तथा आयुक्त यांच्याकडे असंख्य तक्रारी झाल्या आहेत. त्याचबरोबर पालकमंत्री मुनगंटीवार यांच्याकडेही विविध पक्षांच्या महिला संघटना तसेच ग्राम पातळीवरील महिलांनी तक्रारी केल्या आहेत. दारूबंदीपूर्वी या जिल्ह्यात ५२५ मद्यालये होती, आता ही संख्या ७२५ च्या वर गेली आहे. ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ची प्रकरणे ९०० टक्क्यांनी वाढली आहेत. मद्यविक्री दुकानांबाबत नागरिकांच्या तक्रारींची गांभीर्याने दखल घ्यावी. यापुढे जिल्ह्यात मद्यविक्री दुकानांची संख्या वाढवू नये, असे निर्देश पालकमंत्री मुनगंटीवार यांनी दिले.

Story img Loader