रवींद्र जुनारकर, लोकसत्ता

चंद्रपूर : लोकसभा लढण्याची इच्छा नसतानाही भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य तथा मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवल्याने पक्षातीलच विरोधकांची ही खेळी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. दुसरीकडे, मुनगंटीवार यांना विजय संपादन करायचा असेल तर हंसराज अहीर, माजी मंत्री शोभा फडणवीस, अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांच्यासह अनेकांशी सूर जुळवून घ्यावे लागणार आहे.

Ajit pawar maratha leader rising in Delhi
Ajit Pawar: अजित पवार दिल्लीतील नवे मराठा स्ट्राँगमॅन; खासदार सुनेत्रा पवार यांना शरद पवारांसमोरील बंगला मिळाल्यामुळे चर्चांना उधाण
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Rahul Narwekar
Rahul Narwekar : संख्याबळ नाही तरीही मविआला विरोधी पक्षनेतेपद देणार का? राहुल नार्वेकरांनी स्पष्टच सांगितलं
Jyotiraditya Scindia lady killer said Kalyan Banerjee
“सिंधिया लेडी किलर”, तृणमूलचे खासदार असं का म्हणाले? केंद्रीय मंत्र्याचंही जशास तसं प्रत्युत्तर
News About Parliament
BJP : उपराष्ट्रपती व्ही. पी. धनखड यांना हटवण्यासाठी विरोधकांचा गोंधळ, भाजपाने नेमकी काय खेळी केली?
News About Loksabha
Parliament : संसदेत उफाळून आलेला विधेयकांच्या नावांचा वाद काय? विरोधी पक्षांनी नेमकं काय म्हटलं आहे?
Rahul Gandhi Protest against modi shah
मोदी-अदाणीविरोधात काँग्रेस आक्रमक; राहुल गांधींच्या अनोख्य आंदोलनाने वेधले लक्ष
jayant patil rahul narvekar
Video: “राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निकालावर सर्वोच्च न्यायालय अजून विचार करतंय”, जयंत पाटील यांची टोलेबाजी!

जिल्हा भाजपवर मुनगंटीवार यांचे निर्विवाद एकहाती वर्चस्व आहे. संघटनेवर वर्चस्व असतानाही मुनगंटीवार लोकसभा लढण्यासाठी उत्सुक नव्हते. मात्र केंद्रीय नेतृत्वाने मुनगंटीवार यांच्याच गळ्यात लोकसभेची माळ टाकली. यामागे पक्षातील विरोधकांचेच प्रयत्न होते, असे बोलले जात आहे. अजातशत्रू, हुशार, कल्पक तथा निधी खेचून आणण्याची धमक असलेल्या तथा मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत प्रमुख नाव असल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच मुनगंटीवार राज्यात नको होते, त्यांनीच मुनगंटीवार यांचे नाव केंद्रीय नेतृत्वाला कळवले आणि पद्धतशीरपणे लोकसभेच्या रिंगणात उतरवून पक्षातील प्रमुख अडथळा दूर केला, अशीही चर्चा आहे.

आणखी वाचा- नागपूर : मसाजच्या नावावर तरुणींकडून देहव्यापार, ड्रीम फॅमिली स्पामध्ये ‘सेक्स रॅकेट’

याचबरोबर मुनगंटीवार यांचे पक्षातही अनेक विरोधक आहेत. या सर्व विरोधकांनी एकत्र येत ही खेळी खेळल्याचे बोलले जात आहे. असे असले तरी आता उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मुनगंटीवार यांना सर्वप्रथम पक्षातील विरोधकांशी जुळवून घ्यावे लागणार आहे. यामध्ये सर्वात आघाडीवरचे नाव अहीर यांचे आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतील पराभवाला कुठेतरी मुनगंटीवार कारणीभूत आहे, ही सल अहीर यांच्या मनात आहे. आता मुनगंटीवार यांना लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात अहीर यांना सोबत घेऊन फिरावे लागणार आहे.

तसेच माजीमंत्री तथा भाजपच्या ज्येष्ठ नेत्या शोभा फडणवीस यांच्याशी सूर जुळवून घ्यावे लागणार आहे. मानव-वन्यजीव संघर्ष तसेच इतर अनेक मुद्यांवरून फडणवीस यांनी मुनगंटीवार यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला आहे. चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार व मुनगंटीवार यांच्यातही मतभेद आहेत. विकासाच्या कामांवरून या दोघांमध्ये अनेकदा खटके उडाले आहेत. मुनगंटीवार हे जोरगेवार यांचे राजकीय गुरू आहेत. मात्र, या गुरूशिष्यांच्या जोडीत मतभेद असल्याने आता मुनगंटीवार यांना लोकसभेत जायचे असेल तर जोरगेवार यांच्याशी जुळवून घ्यावे लागणार आहे.

आणखी वाचा- वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण बंद करण्याचा घाट!

या सर्वांसोबतच भाजपमध्ये काँग्रेसचे काम करणारी काही मंडळी सक्रिय आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या अनेक माजी नगरसेवकांनी उघडपणे बाळू धानोरकर यांच्यासाठी काम केले होते. मुनगंटीवार यांना या सर्वांपासून सावध राहून त्यांच्याकडून पक्षाचे काम करवून घ्यावे लागणार आहे. या सर्वांशी जुळवून घेतले तरच मुनगंटीवार यांना लोकसभा निवडणूक सोपी जाईल, अन्यथा त्यांच्या मार्गात अनेक अडथळे येऊ शकतात, असे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.

Story img Loader