Sudhir Mungantiwar meets Nitin Gadkari : राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी सोमवारी (१६ डिसेंबर) नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. राज्य मंत्रिमंडळामध्ये मुनगंटीवार यांचे नाव नव्हते. त्यानंतर त्यांनी यासंदर्भात नितीन गडकरी यांच्यासोबत सुमारे दीड तास चर्चा केली. आपण नितीन गडकरी यांचे मार्गदर्शन घेतले. नितीन गडकरी हे सुरुवातीपासून आपले मार्गदर्शक आहेत. त्यामुळे त्यांची भेट घेतली, असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

आपण कोणत्याही प्रकारे नाराज नाही. आपण कधीही नाराज असू शकत नाही. अनेक वर्ष आपण विरोधी पक्षांमध्ये होतो. त्यावेळी देखील आपण जनतेच्या हिताची कामे केली. आता आपण मंत्री नसलो तरी आमदार म्हणून जनतेच्या हितासाठी संसदीय आयुधांचा वापर करणार आहे. जनतेच्या सेवेचे व्रत आपण घेतले आहे, ते कायम सुरू राहणार असल्याचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी ठामपणे नमूद केले.

Maharashtra Deputy CM Ajit Pawar Dissolves NCP Beed Unit
राष्ट्रवादीची बीड जिल्हा कार्यकारिणी बरखास्त; मंत्री धनंजय मुंडे यांना धक्का
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Suresh Dhas On Santosh Deshmukh Case
Suresh Dhas : “राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्य मुन्नीला बोलायला लावा?”, सुरेश धस यांचं विधान, रोख कुणाकडे? परळी पॅटर्नचा उल्लेख करत म्हणाले…
Eknath Shinde on Santosh Deshmukh Murder Case
Eknath Shinde: “कुणाचेही लागेबंधे असले तरी…”, संतोष देशमुख प्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा इशारा
Controversy over MLA Suresh Khades statement about Miraj constituency as mini Pakistan
मिरजेच्या उल्लेखावरून वातावरण तापले
Ajit Pawar dhananjay munde walmik karad
“बळं बळं चौकशी…”, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर अजित पवारांचा संताप; म्हणाले, “या प्रकरणात…”
Devendra Fadnavis Speech
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याने हास्यकल्लोळ, “सकाळचा शपथविधी नको म्हणून यावेळी आम्ही संध्याकाळी…”
Image of Ajit Pawar
Ajit Pawar : “पक्ष वगैरे न बघता…” धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर अजित पवारांची मोठी प्रतिक्रिया

हेही वाचा – आमदार निवासातील गरम पाण्याचे गिझर बंद; आमदार म्हणतात, “अंघोळ करायची कशी?”

भारतीय जनता पक्षाचे आपण एकनिष्ठ कार्यकर्ते आहोत. याच जन्मात नव्हे तर पुढील अनेक जन्मातही आपण भाजपमध्ये असू. राष्ट्रसेवा करण्याची संधी आपल्याला भाजपनेच दिली. त्यामुळे पुढील रणनीती ही भाजपचा आमदार म्हणून जनसेवेची असेल. मंत्री म्हणून आपण यापूर्वीही जनतेचीच कामे करीत होतो. आता आमदार म्हणूनही जनतेची कामे करताना आपल्याला कोणतीही अडचण येणार नाही, असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

पक्षाने आपल्याला वेगळी जबाबदारी देण्याचा निर्णय घेतल्याचे आपल्याकडून कळले आहे. त्यामुळे पक्ष देईल ती नवी जबाबदारी स्वीकारणार असल्याचे सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले. विधिमंडळाशी संबंधित सर्व पुस्तकांचा पुन्हा आपण अभ्यास करणार आहे. संसदीय आयुधांचा वापर करीत आपण जनतेच्या सेवेचे कामे करणार असल्याचेही सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.

एखाद्या छोट्याशा गोष्टीवरून अशा प्रकारे वागणूक भाजपमध्ये दिली जात नाही. पक्षाने योग्य विचार करूनच काहीतरी निर्णय घेतला असेल. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आणि देवेंद्र फडणवीस यांनी आपले नाव यादीत असल्याचे सांगितले होते. पण नंतर नाव नव्हते. असेही सुधीर मुनगंटीवार यांनी नितीन गडकरी यांच्या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

हेही वाचा – Ravi Rana : रवी राणांची नाराजी कायम; अधिवेशनात उपस्थित न राहता गोसेवेत व्यस्त

अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सुधीर मुनगंटीवार हे कामकाजामध्ये उपस्थित नव्हते. त्यावर बोलताना ते म्हणाले की, पहिल्या दिवशी फार काही महत्त्वाचे कामकाज नव्हते. मंत्री म्हणून अनेक फाइल्स हाताळाव्या लागतात. अधिकाऱ्यांकडून चर्चेतील मुद्द्यांवर ब्रीफिंग केले जाते. आजचा कोणताही मुद्दा नव्हता. त्यामुळे आपण विधिमंडळात आलो नाही. आपण कोणत्याही परिस्थितीत नाराज नाही. आपण नाराज राहणारे व्यक्ती नाही असे मुनगंटीवार यांनी पुन्हा एकदा नमूद केले.

Story img Loader