‘टायगर अभी जिंदा है’! मुनगंटीवार म्हणाले होते, ‘मैं चुनाव हारा हूं, हिम्मत नही’

‘मैं चुनाव हारा हूँ… हिम्मत नहीं हारा’ हे त्यांचे शब्द होते. विधानसभा निवडणुकीत दमदार विजय मिळवत त्यांनी आपले शब्द तंतोतंत खरे ठरवले आहेत.

sudhir mungantiwar old statement main chunav hara hu himmat nahi goes viral after wining vidhan sabha election 2024
आजच्या त्यांच्या विजयानंतर 'टायगर अभी जिंदा है..', अशा प्रतिक्रिया जनतेतून उमटत आहे.(लोकसत्ता टीम)

लोकसत्ता टीम

चंद्रपूर : लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आणि चंद्रपूरसाठी भाजपच्या यादीत सुधीर मुनगंटीवार यांचे नाव आले. हे त्यांच्या इच्छेविरुद्ध घडले होते. पण तरीही पक्षाच्या शिर्षस्थ नेत्यांचा आदेश पाळून ते लोकसभा निवडणूक लढले. पूर्ण शक्ती लावली.

काँग्रेसच्या फेक नरेटिव्हमुळे त्यांचा पराभव झाला. पण ते मुनगंटीवार आहेत. पराभव झाल्यावर पंतप्रधान मोदींच्या अभिनंदनासाठी त्यांनी सभा घेतली. ती सभा नव्हती… एल्गार होता. ‘मैं चुनाव हारा हूँ… हिम्मत नहीं हारा’ हे त्यांचे शब्द होते. विधानसभा निवडणुकीत दमदार विजय मिळवत त्यांनी आपले शब्द तंतोतंत खरे ठरवले आहेत. आजच्या त्यांच्या विजयानंतर ‘टायगर अभी जिंदा है..’, अशा प्रतिक्रिया जनतेतून उमटत आहे.

आणखी वाचा-‘राणाजी माफ करना…’ गाण्‍यावर नवनीत राणा थिरकल्‍या!

विधानसभा निवडणुकीत बल्लारपूर मतदारसंघातून सुधीर मुनगंटीवार यांनी २६ हजार ४७ मतांची आघाडी घेत दणदणीत विजय मिळवला आहे. गेल्या दहा वर्षांमध्ये बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाचा चेहरामोहरा त्यांनी बदलवला. त्यामुळे जनतेने त्यांना कौल दिल्याचे आता सिद्ध झाले आहे. सुधीर मुनगंटीवार यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर त्यांना विधानसभेत मात देणे सोपे आहे, असे महाविकास आघाडीला वाटले होते.

विशेषतः चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाने काँग्रेसच्या बाजुने कौल दिल्यामुळे काँग्रेसचा कॉन्फिडन्स वाढला होता. पण तो काँग्रेसचा अतिआत्मविश्वास ठरला. अन् तोच त्यांना नडला. बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाला सुधीर मुनगंटीवार यांच्याशिवाय पर्याय नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा नव्हती. तरीही त्यांनी आनंदाने पक्षाचा आदेश पाळला. मात्र, त्यांच्या पराभवानंतर मुनगंटीवारांचा जलवा कमी झाला, असा अनेकांचा गैरसमज झाला होता, तो आजच्या निकालाने खोटा ठरला.

आणखी वाचा-काटोलमधील देशमुख पर्व संपुष्टात, सावनेरमध्ये उदय

लोकसभेतील पराभवानंतरही मुनगंटीवार यांनी २२ जून २०२४ ला बल्लारपूरला एक सभा घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अभिनंदनासाठी ही सभा होती. या सभेतील मुनगंटीवार यांचे शब्द लोक विसरलेले नव्हते. ‘मैं चुनाव हारा हूं… हिम्मत नहीं हारा’ असे त्यांनी लोकांना सांगितले. त्यानंतर ते पराभव विसरून पुन्हा कामाला लागले. राज्याचे मंत्री म्हणून त्यांच्याकडे असलेल्या जबाबदाऱ्यांचे उत्तमरित्या पालन केले. अगदी प्रचाराच्या धामधुमीतही त्यांनी जनतेच्या कामांकडे दुर्लक्ष केले नाही.

जनकल्याणाचा जाहीरनामा घेऊन जनतेपुढे गेले. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या जाहीरनामा समितीचे ते प्रमुख आहेत. जनतेची नस माहिती असलेला नेता जाहीरनामा ठरविण्याच्या प्रक्रियेत केंद्रस्थानी होता. त्यामुळे विकासाचा रथ बल्लारपूरच्या माध्यमातून पुढे जाणार, याचा विश्वास मतदारांना होता. त्याचा परिणाम निवडणुकीच्या निकालावर दिसला, असेच म्हणावे लागेल.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sudhir mungantiwar old statement main chunav hara hu himmat nahi goes viral after wining vidhan sabha election 2024 rsj 74 mrj

First published on: 23-11-2024 at 19:59 IST

आजचा ई-पेपर : नागपूर / विदर्भ

वाचा
epaper image

संबंधित बातम्या