नागपूर : स्वातंत्र्यवीर सावरकर अनेकांचे प्रेरणास्थान होते. मात्र, ज्यांनी भारतीय विद्यापीठात शिक्षणच घेतले नाही, त्यांना सावरकर यांचा इतिहास काय कळणार, अशी टीका वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राहुल गांधी यांचे नाव न घेता केली.
मुनगंटीवार एका खासगी कार्यक्रमासाठी नागपुरात आले असता ते प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले, राहुल गांधी अंदमान निकोबारच्या काळ्या कोठडीत एक तास काढू शकणार नाही. ज्यांना इतिहास माहीत नसेल अशा लोकांना जनतेने धडा शिकवण्याची गरज आहे.
हेही वाचा >>> वर्धा: आता हिंदी विद्यापीठातही ‘हनुमान चालिसा’; दोन गटातील वादाने परिसरात तणाव
संभाजी नगरात सभा घेण्यासाठी कुठलाही आक्षेप असता कामा नये. सरकार विरोधात आंदोलन व्हावे, दंगे भडकावे यासाठी सभा होत असेल तर जनतेने महाविकास आघाडीचा खरा चेहरा समजून घ्यावा. शरद पवार म्हणतात सावरकर राष्ट्राचा विषय होऊ शकत नाही. मात्र, सावरकर हा आमचा आस्थेचा विषय आहे, सन्मानाचा विषय आहे. गुजरातमधील अहमदाबादचे नाव सावरकर नगर करा, असे जर शिवसेनेचे नेते म्हणत असतील तर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घ्यावी. जनतेच्या पैशातून एक पेन विकत घ्या. हे नाव बदलले पाहिजे यासाठी शरद पवार, उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी, सोनिया गांधी यांचे पत्र घ्या आणि नाव बदलण्यासाठी अर्ज करा, अशी उपरोधिक टीका मुनगंटीवार यांनी केली.