चंद्रपूर : संपूर्ण विश्वाला अहिंसेचा मंत्र देणाऱ्या महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त लंडनमधील भारतीय विद्याभवन येथील महात्मा गांधी स्मारकास भेट देत राज्याचे सांस्कृतीक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी महात्मा गांधीजींना आदरांजली वाहिली. राज्याचे वन, सांस्कृतीक कार्य तथा मस्त्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार छत्रपती शिवाजी महाराज यांचे वाघनखं भारतात आणण्यासाठी आज लंडन येथे दाखल झाले आहेत.
हेही वाचा >>> यात्रा काढून भाजपने ओबीसी जनगणनेपासून पळ काढू नये, विरोधी पक्ष नेते वडेट्टीवार आक्रमक
सर्वप्रथम वाघनखासाठी करारावर स्वाक्षरी होणार आहे. त्यानंतर वाघनखं भारतात आणली जाणार आहे. २ ऑक्टोंबर महात्मा गांधी यांच्या जयंती दिनी मुनगंटीवार लंडन येथे दाखल होताच त्यांनी भारतीय विद्याभवन येथील महात्मा गांधी स्मारकास भेट देत आदरांजली वाहिली. तसेच ‘जय जवान, जय किसान’चा नारा देणारे माजी पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांनाही अभिवादन केले.