चंद्रपूर : आज बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा मला जनतेने निवडून दिले आहे. माझा या मतदारसंघातील हा सलग चौथा विजय आहे. एखाद्या मतदारसंघातील लोक वारंवार तुमच्यावर विश्वास दाखवतात तेव्हा ती निवडणूकही जनतेची असते आणि विजय देखील जनतेचाच असतो. या प्रेमासाठी मी माझ्या मतदारसंघातील जनतेच्या आणि लाडक्या बहिणींच्या कायम ऋणात राहील, या शब्दांत राज्याचे वने व सांस्कृतीक कार्य आणि जिल्ह्याचे पालकमंत्री तथा बल्लारपूर मतदार संघाचे विजयी उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.

बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातून सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या विजयाचे श्रेय सर्वसामान्य व गोरगरीब जनतेला दिले आहे. जनतेचा आशीर्वाद, कार्यकर्त्यांचे परिश्रम आणि बल्लारपूर मतदारसंघातील विकासाचा झंझावात यालाच विजयाचे श्रेय जाते. बल्लारपूर मतदारसंघातील मतदारांचे मनःपूर्वक आभार, अशी भावना ना. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे.

Barsu oil refinery project
बारसू रिफायनरी प्रकल्पावरुन महायुतीत जुंपली
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
BJPs grand convention at Chhatrapati Sambhajinagar in the presence of Prime Minister Narendra Modi
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत भाजपचे छत्रपती संभाजीनगरला महाअधिवेशन
Nana Patole
Nana Patole : “उत्तमराव जानकरांसह आम्ही खूप लोक राजीनामा द्यायला तयार, पण…”; नाना पटोलेंचं मारकडवाडीत मोठं विधान
Sadabhau Khot
“राहुल गांधींचं एकच स्वप्न, मेरी शादी कब होगी?” मारकडवाडीतून सदाभाऊ खोतांचा चिमटा; ‘खळं लुटणारा’ म्हणत पवारांवर टीका
Diljit Dosanjh invokes Rahat Indori poetry amid calls to cancel Indore concert
कॉन्सर्ट रद्द करण्यासाठी बजरंग दलाचे आंदोलन, दिलजीत दोसांझ म्हणाला, “किसी के बाप का हिंदुस्तान थोडी है”
mahavikas aghadi mla
अन्वयार्थ : आत्मपरीक्षणाऐवजी बहिष्कार‘नाट्य’!
Sudhir Mungantiwar On Karnataka
Sudhir Mungantiwar : “कर्नाटक सरकारला याचा हिशेब द्यावा लागेल”; सुधीर मुनगंटीवार यांचा इशारा, कारण काय?

हेही वाचा…सिंदखेडराजा, मेहकरमध्ये धक्कादायक निकाल; बुलढाण्यात जिल्ह्यात महायुतीचे निर्विवाद वर्चस्व

‘बल्लारपूर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजप-महायुतीचा उमेदवार म्हणून झालेला माझा विजय म्हणजे ईश्वराचा अंश असलेल्या जनतेचा विजय आहे. या विजयाच्या मुळाशी कार्यकर्त्याचे परिश्रम आहेत. बल्लारपूर विधानसभेत भाजपा महायुतीच्या माध्यमातून करण्यात आलेल्या अभूतपूर्व विकास कामांचा हा विजय आहे. हा विजय आपण नम्रतेने स्वीकारत असून पुढील काळात बल्लारपुर मतदारसंघ हा राज्यातील प्रथम क्रमांकाचा मतदार संघ म्हणून विकसित करण्याचा संकल्प आहे,’ असा निर्धारही मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

बल्लारपूर मतदारसंघाची निवडणूक भाजप-महायुतीने विकासाच्या मुद्द्यावर लढवली, असेही ते म्हणाले. ‘आम्ही विकासकामे घेऊन मतदारांपुढे गेलो आणि त्याच मुद्यावर निवडणूक लढवली. विधानसभेतील नागरिकांनी मला मतरुपी आशीर्वाद देत विकासाच्या बाजूने कौल दिला. मतदारांच्या प्रेमाला आणि विश्वासाला आम्ही कधी उतराई होणार नाही,’ असेही सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

हेही वाचा…Amravati vidhan sabha election result 2024 :अमरावती जिल्‍ह्यात दिग्‍गजांना पराभवाचा धक्‍का; भाजप सर्वात मोठा पक्ष, काँग्रेसने वर्चस्‍व गमावले

विजय झाला तर माजायचे नाही

‘विजय झाला तर माजायचे नाही आणि पराभव झाला तर लाजायचे नाही’ या सूत्रानुसार आम्ही या क्षेत्रात कार्यरत आहोत. बल्लारपूर मतदारसंघातील विकासकामांचा झंझावात यापुढे असाच पुढे नेणार आहे. मतदारांनी दाखवलेल्या विश्वासाला मी कधीही तडा जाऊ देणार नाही, असा विश्वासही मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

Story img Loader