नागपूर : मध्यवर्ती कारागृहात एका कैद्याने स्वत:च्या हातावर लोखंडी पत्र्याने वार करत आत्महत्येचा प्रयत्न केला व आत्महत्येच्या प्रयत्नात कारागृहातील अधिकाऱ्यांनाच फसवण्याची धमकी दिली.

सिजो चंद्रण एल. आर. चंद्रण (४०) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी मध्यवर्ती कारागृहातील कोठडी क्रमांक ४ मध्ये शिक्षा भोगत आहे. त्याने कारागृहात स्वत:च्या डाव्या हातावर लोखंडी पत्र्याने वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला. अधिकाऱ्यांनी तातडीने आरोपीला मेडिकल रुग्णालयात दाखल केले.

हेही वाचा – नागपूर : कोरडीतील वीज प्रकल्पाला विरोध, ऊर्जामंत्र्यांना बांगड्यांचा अहेर! आंदोलन कुणाचे?

कारागृह अधीक्षक कुंभरे यांच्या तक्रारीवरून आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शहरात चालले काय? हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

Story img Loader