नागपूरः शहरातील एका नामांकित बांधकाम व्यावसायिकाने आर्थिक ताण-तणावातून आठ मजली इमारतीवरुन उडी घेऊन आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना आज, रविवारी दुपारी उघडकीस आली. अभिजीत बाबूराव दुधाने (४५) असे मृत बांधकाम व्यावसायिकाचे नाव आहे.

अभिजीत दुधाने हे नामांकित बांधकाम व्यावसायिक आहे. ते गेल्या काही दिवसांपासून तणावात होते. अभिजीत आणि एक राजकीय नेता उद्या सोमवारी एका प्रॉपर्टीचा खरेदी-विक्रीचा सौदा करणार होते. मात्र, त्यांनी आज अचानक आत्महत्या केल्यामुळे त्यांच्या मृत्यूबाबत चर्चेला उधान आले आहे. ते आज दुपारी ऑरबिट सोसायटीच्या आठ मजली इमारतीवर गेले. तेथून त्यांनी उडी घेऊन आत्महत्या केली.

हेही वाचा >>>चंद्रपूर: शेकडो शिक्षकांना अतिरिक्त होण्यापासून दिलासा; आ. सुधाकर अडबाले यांच्या मागणीला यश

अभिजीत यांच्या आत्महत्येमुळे बांधकाम निर्मिती क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. एमआयडीसी पोलिसांनी या प्रकरणी तुर्तास आकस्मिक मृत्यूची नोंद केली. मात्र, अभिजीत यांच्या आत्महत्येचे नेमके कारण काय? याबाबत पोलीस तपास करीत आहेत.

Story img Loader