प्रेमसंबंधानंतर प्रियकराच्या कुटुंबियांचा लग्नाला विरोध असल्यामुळे त्रस्त झालेल्या प्रेयसीने घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणी तिचा प्रियकर आणि त्याच्या आईविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. प्रेयसीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी शांतीनगर पोलिसांनी प्रियकराला अटक केली, तर त्याची आई फरार झाली आहे. अजय अरुण पद्माकर (३३) आणि सुमित्रा अरुण पद्माकर (५५) दोन्ही रा. नंदागिरी रोड, पाचपावली, अशी आरोपींची नावे आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ५ फेब्रवारीच्या सकाळी प्रेमनगरच्या झेंडा चौकात राहणाऱ्या दीक्षा (२८) हिने गळफास लावून आत्महत्या केली होती. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला. तपासादरम्यान दीक्षाच्या भावाने पोलिसांना वास्तविकता सांगितली. त्याने पोलिसांना सांगितले की, दीक्षा ही एका महाविद्यालयात शिक्षिका होती. याच महाविद्यालयात शिक्षक असलेल्या अजय पद्माकर याच्याशी तिचे प्रेमसंबंध होते. २० फेब्रुवारी २०१९ ला अजयने दीक्षाशी एका जंगलातील छोट्याशा मंदिरात भांगेत कुंकू भरून प्रेमविवाह केल्याचा बहाणा केला. त्यानंतर दीक्षा अजयच्या घरी राहायला गेली असता त्याची आई सुमित्रा हिने भांडण सुरू केले. शिविगाळ करीत तिला घरातून हाकलले. तेव्हापासून ती अजयला घेऊन भावासोबत राहात होती. काही दिवसांपर्यंत अजयने तिला चांगली वागणूक दिली आणि नंतर लहान-लहान गोष्टींवरून भांडू लागला.

हेही वाचा – नागपूर: राज्यपाल भगतसिंह कोश्यारीं यांच्याकडे तक्रार, … असे आहे प्रकरण

हेही वाचा – अमरावती विद्यापीठाची सिनेट बैठक स्‍थगित करण्‍याचा संदेश धडकला! निर्णय राजकीय हेतूने प्रेरित असल्‍याचा आरोप

आईच्या सांगण्यावरून तो दीक्षाचा छळ करीत होता. दीक्षाच्या इच्छेविरुद्ध त्याने ७ डिसेंबर २०२२ ला तिला घराबाहेर काढले. त्यानंतर दीक्षा सतत तणावात राहू लागली. तिची प्रकृतीही खालावली होती. त्यामुळे तिचे भाऊ आणि आई अजयच्या घरी गेले. त्याची आई सुमित्रा हिला दोघांचेही पुन्हा लग्न लावून देण्याची विनंती केली. मात्र, सुमित्राने भांडण करून दोघांनाही घरातून हाकलले. तणावामुळे दीक्षाने गळफास लावून आत्महत्या केली. पोलिसांनी आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवून अजयला अटक केली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Suicide of girlfriend in nagpur case filed against boyfriend and his mother adk 83 ssb