नागपूर: एका युवकाचे पिस्तुलच्या धाकावर अपहरण करून त्याचे हातपाय बांधून मारहाण करणाऱ्या कुख्यात सुमित ठाकूर टोळीच्या एका सदस्याला मुंबईतून अटक केली. उजैर उर्फ उज्जी अब्दुल परवेज खालिद असे आरोपीचे नाव असून त्याच्यावर पाच वर्षांपूर्वीच मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या १५ दिवसांपूर्वी कुख्यात सुमीत ठाकूर याने पिस्तुल दाखवून एका युवकाचे अपहरण केले. त्याला रात्रभर मारहाण करून लुटमार केली. त्यावेळी उज्जी खालीद यानेच पिस्तूल आणून युवकाला मारहाण केली होती. या प्रकरणी जरीपटका पोलिसांनी सुमितसह त्याच्या टोळीतील ७ जणांवर गुन्हा दाखल केला. उज्जी खालीद याची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून तो मुंबईतून एमडी ड्रग्स विकत आणून नागपुरातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना पुरवितो. त्याने अनेक पबमध्येसुद्धा ड्रग्सचे मोठे जाळे निर्माण केले आहे. त्याचे काही पोलीस कर्मचाऱ्यांशी मैत्रीपूर्ण संबंध आहेत.

हेही वाचा… संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात २१९ पेक्षा जास्त पक्षी प्रजाती

उज्जी हा मुंबईतील डोंगरी पायधुनी परीसरातील लॉजमध्ये लपून बसल्याची माहिती जरीपटका पोलिसांना मिळाली. पोलिसांनी छापा घालून उज्जीला अटक केली. त्याच्या मोबाईलचा सीडीआर काढल्यास मोठा खुलासा होण्याची शक्यता आहे.