लोकसत्ता टीम
अमरावती : उन्हाळी सुट्ट्या सुरू झाल्यामुळे प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता, मध्य रेल्वेने प्रवाशांसाठी मुंबई-नागपूर, पुणे-नागपूर सह इतर मार्गांवर ३३२ उन्हाळी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या सेवेमुळे विदर्भातील प्रवाशांना दिलासा मिळू शकणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-नागपूर द्विसाप्ताहिक विशेष गाडी क्रमांक ०२१३९ ही आठवड्यातून दोनदा चालणारी विशेष गाडी ०६.०४.२०२५ ते २९.०६.२०२५ पर्यंत दर मंगळवार आणि रविवारी सीएसएमटीहून सकाळी ००.२० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी ३.३० वाजता नागपूरला पोहोचेल. या गाडीच्या २५ फेऱ्या राहणार आहेत.
गाडी क्रमांक ०२१४० ही आठवड्यातून दोनदा चालणारी विशेष गाडी ०६.०४.२०२५ ते २९.०६.२०२५ पर्यंत दर मंगळवार आणि रविवारी नागपूरहून रात्री ८ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी १.३० वाजता सीएसएमटीला पोहोचेल. या गाडीच्या २५ फेऱ्या राहणार आहेत. गाडीला दादर (फक्त ०२१३९ साठी), ठाणे, कल्याण, इगतपुरी (फक्त ०२१४० साठी), नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा हे थांबे राहणार आहेत. गाडी क्रमांक ०१४६९ पुणे – नागपूर – पुणे साप्ताहिक सुपरफास्ट एसी स्पेशल पुणे येथून दर मंगळवारी ०८.०४.२०२५ ते २४.०६.२०२५ पर्यंत १५.५० वाजता निघेल आणि दुसऱ्या दिवशी ०६.३० वाजता नागपूरला पोहोचेल या गाडीच्या १२ फेऱ्या राहणार आहेत.
गाडी क्रमांक ०१४७० एसी साप्ताहिक सुपरफास्ट स्पेशल नागपूरहून दर बुधवारी ०९.०४.२०२५ ते २५.०६.२०२५ पर्यंत सकाळी ८.०० वाजता निघेल आणि त्याच दिवशी रात्री ११.३० वाजता पुणे येथे पोहोचेल. या गाडीच्याही १२ फेऱ्या राहणार आहेत. गाडी क्रमांक ०१४६७ पुणे – नागपूर – पुणे साप्ताहिक सुपरफास्ट स्पेशल पुणे येथून दर बुधवारी ०९.०४.२०२५ ते २५.०६.२०२५ पर्यंत १५.५० वाजता निघेल आणि दुसऱ्या दिवशी ०६.३० वाजता नागपूरला पोहोचेल. या गाडीच्या १२ फेऱ्या राहणार आहेत.
गाडी क्रमांक ०१४६८ साप्ताहिक सुपरफास्ट स्पेशल १०.०४.२०२५ ते २६.०६.२०२५ पर्यंत दर गुरुवारी नागपूरहून सकाळी ८.०० वाजता निघेल आणि त्याच दिवशी रात्री ११.३० वाजता पुणे येथे पोहोचेल. या गाडीच्या देखील १२ फेऱ्या आहेत. ०१४६९/०१४७० आणि ०१४६७/०१४६८ साठी उरुळी, दौंड कॉर्ड लाईन, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा हे थांबे आहेत.