नागपूर : नागपूरसह संपूर्ण विदर्भात पहिल्या दोन टप्प्यांत लोकसभेच्या निवडणुका आटोपल्याने पुढच्या टप्प्यांतील निवडणूक प्रचारासाठी विदर्भातील आमदार विविध मतदारसंघात तळ ठोकून आहेत. तिसर्‍या टप्प्यात बारामतीसह राज्यातील आठ मतदारसंघात मतदान होते. विदर्भातील काँग्रेस नेते सुनील केदार बारामती मध्ये सुप्रिया सुळेंच्या प्रचाराला गेले होते. चौथ्या टप्प्यात १३ मे ला पुणे लोकसभा मतदारसंघासह अकरा मतदारसंघात मतदान आहे. तेथील काँग्रेस उमेदवार रवींद्र धनगेकर यांच्या प्रचारासाठी केदार पुण्यात तळ ठोकून आहे. त्यांनी माध्यमांशी बोलताना पुण्यातील नागरिकांचा कौल काय असेल यावर भाष्य केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

केदार म्हणाले, पुणेकर कायम सामान्य माणसाला अनुकूल अशी भूमिका घेतात. त्यानांच निवडून देतात. काँग्रेस उमेदवार रवींद्र धनगेकर हे सर्व सामान्यांचे प्रतिनिधी आहेत. विरोधकांनी कितीही आरोप, प्रत्यारोप केले. धनशक्तीचा वापर केला तरी पुणेकरांचा निर्णय झाला आहे.
विकासाच्या बाबतीत महायुतीचे नेते मोठे दावे करतात. पण शुक्रवारी एक तासाच्या पावसात पुणेकरांची जी ससेहोलपट झाली. त्यामुळे विकासाचा सत्ताधाऱ्यांचा दावा फोल ठरतो, पुण्याचा विकास नाही तर भकास झाला,असे केदार म्हणाले.

हेही वाचा…रक्षक की भक्षक? पोलिसानेच विनयभंग करून शरीरसुखाची मागणी केल्याचा आरोप; महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल

निवडणुकीच्या काळात सत्ताधारी पक्षांकडून पैसे वाटल्या जात असल्याचा आरोप केला जात आहे, याबाबत विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना केदार म्हणाले, हा प्रकार सर्रास सुरू आहे. हे तेच करू शकतात.पण पुणेकर त्यांना दाद देणार नाही. राज ठाकरे यांना मागील दहा वर्षात कधीच लोकांनी गांभीर्याने घेतले नाही. त्यामुळे पुण्यात यैऊन त्यांनी काहीही भाष्य केले किंवा फतवा काढला तरी त्याचा विशेष परिणाम पुण्याच्या मतदारावर होणार नाही, असे केदार म्हणाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sunil kedar going in various constituencies of maharashtra for lok sabha election campaign of congress and maha vikas aghadi s candidates cwb 76 psg
Show comments