नाशिकमध्ये काँग्रेसच्या उमेदवाराबाबत ज्या नाट्यमय घडामोडी झाल्या, त्यामुळे पक्ष कमजोर झालाच आहे. पण पक्ष नेतृत्व देशात पक्ष मजबूत करायला निघालेले असताना आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी घरातले प्रश्न घरात बसूनच सोडवले पाहिजे, अशी भूमिका माजी मंत्री सुनील केदार यांनी मांडली. ते नागपुरात एका वृत्तवाहिनीशी रविवारी बोलत होते.

हेही वाचा >>>नागपूर : मोदी सरकारविरोधात कॉंग्रेसचे एलआयसी, एसबीआयसमोर निदर्शने

Hindu Bahujan mahasangh
नागपूर : अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या वर्गीकरणाचा विषय तापला, हिंदू बहुजन महासंघाचा इशारा
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Stock market today BSE Sensex crashes over 1000 points
मुंबई शेअर बाजार हजार अंशांनी कोसळला; डॉलरच्या तुलनेत भारतीय चलन विक्रमी नीचांकावर
shivsena marathi news
पुण्यात भाजपच्या खेळीने शिवसेनेच्या दोन्ही गटांत अस्वस्थता
Third consecutive losing session for Sensex Nifty
‘आयटी’ वगळता सारेच घसरणीला! सेन्सेक्स-निफ्टीसाठी सलग तिसरे नुकसानीचे सत्र
lokmanas
लोकमानस: उपभोग, गुंतवणूक, निर्यातीत वाढ आवश्यक
Markets uneasy over concerns of GDP slowdown print eco news
‘जीडीपी’ मंदावण्याच्या चिंतेने बाजारात अस्वस्थता
India GDP growth rate
भारताचा जीडीपी विकासदर मंदावण्याचा अंदाज चिंताजनक, पण धक्कादायक नाही! असे का?

नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीदरम्यान काँग्रेसचा उमेदवार ठरवण्यावरून अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. डॉ. सुधीर तांबे यांना एबी फॉर्म दिल्यानंतरही सत्यजीत तांबे यांनी अपक्ष अर्ज भरला आणि त्यांनी विजय देखील मिळवला. त्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी काँग्रेसने सत्यजीत तांबेंना उमेदवारी द्यायला हवी होती, अशी प्रतिक्रिया दिली आणि काँग्रेसमधील दुफळी उफाळून समोर आली. त्यावर आता राज्याचे माजी मंत्री आणि काँग्रेसचे विदर्भातील नेते सुनील केदार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा >>>“आंदोलन कशाला करता, देवेंद्र फडणवीस यांच्या घरी जाऊन…”, प्रविण तोगडीयांचा खोचक टोला

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर काँग्रेस कारवाई करणार का? असा प्रश्न विचारल्यानंतर सुनील केदार म्हणाले, हे जे घडले ते चांगले नाही. ही घटना दुर्दैवी आहे. या सगळ्याची शहानिशा होणे गरजेचे आहे. मी काँग्रेसचा कार्यकर्ता या नात्याने सर्व काँग्रेसजनांना हेच सांगेन की सध्याची परिस्थिती एकमेकांना समजून घेण्याची आहे. पक्ष कमजोर होईल, अशी विधाने करणे किंवा कृती करणे योग्य होणार नाही. एकत्र बसून घरातला वाद मिटवला पाहिजे.

Story img Loader