नागपूर : विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी रामटेक लोकसभा मतदारसंघातील पक्षाच्या स्थितीचा आढावा शनिवारी नागपुरातील रविभवन येथे घेतला. जिल्हा परिषदेत एकहाती विजयी पतका फडकवल्याबद्दल वडेट्टीवार यांनी माजी मंत्री सुनील केदार यांचे कौतुक केले.

मी आणि सुनील केदार असे नेते आहोत, जेथे हात घातला तिथे हमखास यश मिळवतो. पक्षाने जबाबदारी दिली तर निश्चित रिझल्ट देतो. तुम्हा सर्वांना याचा अनुभव आहेच. ‘पटे तो टेक नही तो रामटेक’, असे आमचे धोरण आहे. मात्र यासाठी तुमच्या सर्वांची साथ लागणार आहे, असे वडेट्टीवार म्हणाले. या बैठकीत नेत्यांची भाषणे सुरू होती. पण माजी मंत्री आमदार सुनील केदार अचानक संतापले. थोडा वेळ कुणाला काहीच कळले नाही. सुनील केदार का संतापले, याबाबत उपस्थितांमध्ये चर्चा सुरू झाली.

Ajit Pawar Bhor Assembly Constituency
Ajit Pawar: ‘नायतर आम्हाला कुत्रं विचारणार नाही’, भरसभेतच अजित पवार भडकले, पोलिसांवर व्यक्त केला संताप
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Sharad pawar on ajit pawar
Sharad Pawar : “नाद करायचा नाय….”, भरसभेत शरद पवारांचा अजित पवारांना थेट इशारा; म्हणाले, “एकदा रस्ता चुकला की…”
maharashtra assembly elections
२०१९ च्या त्या बैठकीत काय घडलं? कथित सत्तांतर घडवणारी बैठक कधी, केव्हा, कुठे झाली होती?
Devendra Fadnavis, Mahesh Landge,
“महेश लांडगे यांचा कुणी बालही बाका करू शकत नाही”, असं देवेंद्र फडणवीस का म्हणाले?
prithviraj chavan congress cm
मविआची सत्ता आल्यास पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असणार? स्वतःच उत्तर देताना म्हणाले…
Kalwa-Mumbra Constituency,
कळवा-मुंब्य्रात गुरु-शिष्याची नव्हे तर धर्म-अधर्माची लढाई, कृषीमंत्री धनंजय मुंडे यांचे मुंब्य्रातील सभेत विधान

हेही वाचा – अल्पवयीन मुलीवर बलात्कार; इचलकरंजीत तरुणास अटक

हेही वाचा – कोल्हापूरला महापालिका आयुक्त मिळण्यासाठी ‘आप’चे गाऱ्हाणे आंदोलन

या बैठकीत १३ पैकी ४ तालुकाध्यक्षांना बोलण्याची संधी देण्यात आली. भाषणासाठी कामठीचे तालुकाध्यक्ष नाना कंभाले यांचे नाव उच्चारताच सुनील केदार यांनी संताप व्यक्त केला. शेजारी बसलेले जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांच्याकडे बघून केदारांनी नाराजी दर्शवली. केदारांच्या नाराजीमुळे कंभाले यांना केवळ दोनच मिनिटे बोलता आले. कंभाले यांनी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत बंडखोरी केली होती आणि सुनील केदार यांनी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची धुरा खांद्यावर घेतली होती. त्यामुळे केदार यांची कंभाले यांच्यावर खप्पामर्जी आहे.