नागपूर : माजी मंत्री सुनील केदार यांचा जामीन नागपूर सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. केदार यांना दिलेली शिक्षा चुकीची असल्याचे कुठलेही पुरावे सादर केले गेले नाही. त्यामुळे त्यांना जामीन दिल्याने समाजात चुकीचा संदेश जाईल, असे सांगत न्यायालयाने जामीन फेटाळला. याशिवाय केदार यांची दोषसिद्धीला स्थगिती देण्याची मागणीही न्यायालयाने फेटाळून लावली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा – अकोला : धक्कादायक..! शासकीय रुग्णालयातील जेवणात जिवंत अळ्या; अधिष्ठांतांकडून चौकशीचे आदेश

हेही वाचा – आश्चर्यच! गाय म्हणते, “जो हुकूम मेरे आका…”, मालकाने दिलेला आदेश पाळणारी ‘देवणी’

शनिवारी अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. एस. पाटील (भोसले) यांनी हा निर्णय दिला आहे. मागील आठवड्यात ट्रायल कोर्टाने केदार यांच्यासह सहा आरोपींना नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळा प्रकरणी पाच वर्षांची शिक्षा ठोठावली होती. यांनतर मंगळवारपासून सत्र न्यायालयात दोषसिद्धीला स्थगितीसह जामिनावर सुनावणी सुरू होती. केदार यांच्यासह एक अन्य आरोपी अशोक चौधरी यांचाही जामीन न्यायालयाने फेटाळला आहे. इतर आरोपींच्या जामिनावर २ जानेवारीला सुनावणी होईल.