लोकसत्ता टीम
बुलढाणा : स्थानिय शासकीय महिला रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन वासेकर यांना आपल्या सहकाऱ्याकडून लाच घेताना रंगेहात पकडण्यात आल्याने आरोग्य सेवा क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली असून शनिवारी रात्री उशिरा बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. बुलढाणा अजिंठा मार्गावरील धाड नाका परिसरातील एका उपहार गृहात ही कार्यवाही करण्यात आली. कंत्राटी तत्वावर कार्यरत डॉक्टरकडून ४८ हजारांची लाच घेतांना त्यांना ताब्यात घेण्यात आले.
आणखी वाचा-अमरावती : लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याने तरुणीची बदनामी, विनयभंग करून धमकी
करोना काळात डॉ. वासेकर यांनी प्रतिकूल स्थितीत रुग्णाची केलेली सेवा, अनेकांना दिलेले जीवदान उल्लेखनीय ठरले. त्याबद्धल त्यांना सन्मानित करण्यात आले होते. महिला रुग्णालयाचे अधीक्षक म्हणूनही त्यांची कामगिरी चांगली ठरली. त्यामुळे त्यांनी घेतलेली लाच अनेकांसाठी धक्कादायक ठरली.