वर्धा : 12th Exam Start Today आजपासून बारावीच्या परीक्षेस सुरवात होत असून अतिसंवेदनशील शाळांवर निगराणी ठेवण्यासाठी थेट तहसीलदारांची नियुक्ती करण्यात आली आहे. सरसकट कॉपी चालणाऱ्या शाळांची अतिसंवेदनशील परीक्षा केंद्र म्हणून नोंद करण्यात आली आहे.राज्यात अशा पाचशेवर शाळा आहेत. या ठिकाणी पूर्ण वेळ बैठे पथक राहणार असून भरारी पथक आकस्मिक तपासणी करणार.
हेही वाचा >>> नागपूर: परीक्षेच्या काळात मुले अभ्यासाचा कंटाळा करतात; पालकांनो ही युक्ती वापरून बघा
अशा केंद्रात एखाद्या वर्गखोलीत कॉपी आढळून आल्यास खोलीवर कार्यरत शिक्षकास निलंबित करण्याचे मौखिक आदेश देण्यात आले आहे. यानंतर संवेदनशील व साधारण अशी परीक्षा केंद्राची वर्गवारी आहे. जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक या दोन वरिष्ठांवर एकूणच परीक्षा निकोप व्हाव्या म्हणून जबाबदारी टाकण्यात आली आहे.