नागपूर : नक्षलवादी चवळवळीचा मुख्य सूत्रधार असलेल्या प्रा. जी.एन. साईबाबा याच्यासह चारजणांना निर्दोष सोडण्याचा नागपूर उच्च न्यायालयाचा वादग्रस्त आदेश सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी रद्द केला. हे प्रकरण कायदा व गुणवत्ता विचारात घेऊन नव्याने निकाल देण्यासाठी उच्च न्यायालयाकडे परत पाठविण्यात आले. त्यामुळे निर्दोष सुटलेला प्रा. साईबाबाच्या अडचणीत वाढ होणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एम. आर. शाह व सी. टी. रविकुमार यांनी प्रकरणातील पक्षकारांची सहमती लक्षात घेता हा निर्णय दिला. त्यांनी प्रकरणाची गुणवत्ता विचारात घेतली नाही. त्यामुळे या प्रकरणावरील सुनावणीदरम्यान नोंदविण्यात आलेल्या निरीक्षणांनी उच्च न्यायालयाने प्रभावित होऊ नये, असे निर्णयात स्पष्ट करण्यात आले.

life sentence prisoner escapes from yerawada jail pune
येरवड्यातील खुल्या कारागृहातून जन्मठेपेची शिक्षा सुनावलेला कैदी पसार
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Supreme Court News
Supreme Court : कामाच्या ठिकाणी भेदभाव झाल्याचा ट्रान्सवुमन शिक्षिकेचा आरोप, सर्वोच्च न्यायालयाने याचिकेवरील निकाल ठेवला राखून
wardha after DNA test and medical evidence real culprit cought and reveal teacher wast father of child
प्रियकर की शिक्षक ! डीएनए ठरला पुरावा आणि न्यायालयाने ठोठावली शिक्षा
mumbai best bus crash driver gets police remand till dec 21
कुर्ला अपघातःचालकाला सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यांत अटक; २१ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी
ghatkopar billboard collapse case, High Court,
घाटकोपर फलक दुर्घटना : आरोपी भावेश भिंडेचा जामीन रद्द करा, सत्र न्यायालयाच्या आदेशाला सरकारचे उच्च न्यायालयात आव्हान
Malkapur court sentenced accused to life imprisonment for sexually abusing minor girl and getting her pregnant
अल्पवयीन मुलीवर मातृत्व लादले ; आरोपीस जन्मठेप , डीएनए चाचणी निर्णायक
villagers rescue accused as well as cop falls into well In sangamner taluka
पुढे आरोपी, मागे पोलीस पाठलागाचा थरार ! आरोपी पाठोपाठ पोलीसही पडला विहिरीत

हेही वाचा – अकोला: माजी सैनिकाच्या गोळीबारात एकाचा मृत्यू; जमिनीच्या वादातून घडले हत्याकांड

उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रोहित देव व अनिल पानसरे यांनी १४ ऑक्टोबर २०२२ रोजी प्रा. साईबाबा प्रकरणात वादग्रस्त आदेश दिला होता. पक्षकारांचे हित लक्षात घेता यावेळी सदर प्रकरणावर दुसऱ्या न्यायपीठामध्ये कार्यवाही पूर्ण करण्यात यावी आणि नवीन न्यायपीठाने या प्रकरणावर चार महिन्यांत निर्णय द्यावा, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले.

याशिवाय पक्षकार उच्च न्यायालयासमक्ष आवश्यक ते सर्व मुद्दे मांडण्यास मोकळे राहतील, असेही नमूद केले. बेकायदा कारवाया (प्रतिबंधक) कायद्यांतर्गत खटला दाखल करण्यापूर्वी केंद्र किंवा राज्य सरकारच्या सक्षम अधिकाऱ्याची मंजुरी मिळविण्याच्या बंधनकारक तरतुदीचे कायदेशीरपणे पालन करण्यात आले नाही, या तांत्रिक कारणामुळे उच्च न्यायालयाने वादग्रस्त आदेश दिला होता. त्याविरुद्ध राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केले होते.

हेही वाचा – कर्नाटक निवडणूक : प्रचारासाठी फक्त गडकरी व फडणवीसच पात्र, महाराष्ट्रातील बाकीच्यांचे काय?

प्रकरणातील इतर आरोपींमध्ये महेश करिमन तिरकी, हेम केशवदत्ता मिश्रा, प्रशांत राही नारायण सांगलीकर व विजय नान तिरकी यांचा समावेश आहे. सहावा आरोपी पांडू पोरा नरोटे (रा. मुरेवाडा, ता. एटापल्ली) याचा २५ ऑगस्ट २०२२ रोजी आजारपणामुळे मृत्यू झाला. या आरोपींविरुद्ध गडचिरोली सत्र न्यायालयामध्ये देशाविरुद्ध दहशतवादी कृत्याचा कट रचणे, दहशतवादी संघटनेला सहकार्य करणे, दहशतवादी संघटनेसाठी कार्य करणे इत्यादी गंभीर गुन्ह्यांतर्गत खटला चालविण्यात आला. त्यात ७ मार्च २०१७ रोजी सत्र न्यायालयाने विजय तिरकीला १० वर्षे सश्रम कारावास तर, इतर सर्व आरोपींना जन्मठेपेची कमाल शिक्षा सुनावली, तसेच सर्वांवर एकूण तीन लाख रुपये दंड ठोठावला. त्याविरुद्ध सर्व आरोपींनी उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. त्यावर वादग्रस्त निर्णय देण्यात आला होता.

साईबाबा ९० टक्के अपंग असून तो दिल्ली विद्यापीठात प्राध्यापक होता. महेश तिरकी मुरेवाडा, ता. एटापल्ली (गडचिरोली), मिश्रा कुंजबारगल, जि. अलमोडा (उत्तराखंड), राही देहरादून (उत्तराखंड) तर, विजय तिरकी धरमपूर, ता. पाखंजूर, जि. कांकेर (छत्तीसगड) येथील रहिवासी आहे.

Story img Loader