बुलढाणा : महाराष्ट्र वैद्यकीय परिषद मुंबई यांचेकडून प्रत्येक जिल्हास्तरावर महाराष्ट्र वैद्यकीय परिषद निवडणूक २०२५ करिता निवडणूक कार्यक्रम घोषीत करण्यात आला होता. त्या अनुषंगाने बुलढाणा जिल्ह्यासह इतर जिल्हात आज (गुरुवारी, ३ एप्रिल) मतदान सुरु असताना निवडणुकीला स्थगिती आली. मतदान प्रक्रिया तत्काळ थांबवावी या आशयाचे मेल आल्याने बुलढाण्यातील मतदान तातडीने थांबविण्यात आले.

इतर जिल्ह्यातही असेच चित्र असल्याचे वृत आहे. महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे निवडणूक अधिकारी तथा वैध्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाचे अवर सचिव यांच्या स्वाक्षरीने हे पत्र बुलढाणा सह सर्व जिल्हाधिकाऱ्यांना मेल द्वारे पाठविण्यात आले.

काय आहे संदेशात?

यात नमूद आहे आहे की, आज ३ एप्रिल रोजी सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणी दरम्यान महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या निवडणुकीसाठी आज ३ तारखेला घेण्यात येणारी मतदान प्रक्रिया स्थगित ठेवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे. यामुळे जिल्हाधिकारी यांनी मतदान तत्काळ स्थगित करुन प्रक्रिया थांबविण्यात यावी. तसेच झालेल्या मतदानाची आकडेवारी महाराष्ट्र वैधकीय परिषदेला कळविण्यात यावी. तसेच मतदान साहित्य व मतदानाशी संबंधित लिफाफे जिल्हा कोषागार कार्यालयात सुरक्षित ठेवण्यात यावे. मुंबई व उपनगर जिल्ह्यातील मतदान साहित्य कुठे ठेवायचे याचा संदेशात स्वतंत्र उल्लेख आहे.

मतदान थांबले

आज दुपारी दीड वाजताच्या सुमारास हे आदेश येऊन धडकताच जिल्हा प्रशासन व निवडणूक यंत्रणाची एकच धावपळ उडाली. बुलढाणा अजिंठा मार्गावरील मतदान केंद्राला याची माहिती देण्यात आली आणि तातडीने मतदान थांबविण्यात आले. यामुळे बुलढाणा शहरातील पाच मतदान पाच मतदान केंद्र वरील मतदान थांबविण्यात आले. स्थानिय धाड नाका परिसरातील लेक्चर हॉल कॉम्प्लेक्स, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा महीला रुग्णालय, टी.वी. हॉस्पीटल परीसर, धाड रोड, बुलढाणा येथे मतदान घेण्यात येत होते. याची जय्यत तयारी करण्यात आली होती.

जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकारी तसेच खासगी डॉक्टर्स मिळून जिल्हयात एकूण २३११ मतदार होते. प्रत्येक मतदारास एकूण ९ (नऊ) मते देण्याचा अधिकार होता. निवडणूकीसाठी जिल्ह्यातील एकूण मतदारांची संख्या लक्षात घेवून एकूण ५ मतदान केंद्र निर्धारित करण्यात आले होते .लेक्चर हॉल कॉम्प्लेक्स, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा महीला रुग्णालय, टी.बी. हॉस्पीटल परीसर, धाड रोड, बुलढाणा येथे जिल्ह्यातील तेवीसशे पेक्षा जास्त मतदारसाठी मतदानची व्यवस्था करण्यात आली होती. मतदान केंद्र १ ते ४ पर्यंत प्रत्येकी ४६० मतदान तर पाचव्या मतदान केंद्रावर ४७१ मतदान होते.

पारंपरिक पद्धतीने म्हणजे मत पत्रिकाचा वापर करुन मतदान सुरु असताना मतदान थांबविण्यात आले. मतदान थांबले तोपवेतो निरुत्साही मतदानची नोंद झाली होती. मतदान गुप्त पध्दतीने महाराष्ट्र वैद्यकीय परिषद नियम १९६७ व महाराष्ट्र वैद्यकीय परिषद (पहिली सुधारणा) नियम २००२ मधील तरतूदीनुसार होणार होते .